Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : नाशिक जिल्ह्यात आणखी एक दुर्घटना , गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पेटला …

Advertisements
Advertisements
Spread the love

नाशिक : नाशिक शहरात एका खासगी बसची कंटेनरला धडक लागून झालेल्या अपघातात बसमधील १२ प्रवाश्यांचा होरपळून  मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यातच गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना मनमाडपासून जवळच पुणे-इंदौर महामार्गावर घडली आहे. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


ट्रकला आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक २ किलोमीटर अंतरावरच रोखून धरण्यात आली आहे. ट्रकमध्ये गॅस ने भरलेले सुमारे २०० सिलेंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे तेथे जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Advertisements

दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास नाशिक-औरंगाबाद मार्गावरील मिरची चौकामध्ये बसला  भीषण अपघात झाला. अपघातानंतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या या बसला आग लागली आणि या आगीमध्ये १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!