ShivsenaNewsUpdate : मोठी बातमी : शिवतीर्थाच्या जागेसाठी शिवसेना अखेर मुंबई उच्चन्यायालयात, तातडीची सुनावणी …

मुंबई : शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दादरवरच दसरा मेळावा घेण्याची भाषा बोलली जात असताना महापालिके दादर येथील शिवाजी पार्कवरच्या जागेबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली असून . शिवसेना आणि शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी मुंबई महापालिकेविरोधात केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रमेश धनुका व न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठाने उद्याच या याचिकेवर तातडीची सुनावणी ठेवली असल्याचे वृत्त आहे.
मुंबई महापालिका, मुंबई महापालिका आयुक्त आणि जी-उत्तर वॉर्डचे सहायक आयुक्त यांच्याविरोधात शिवसेनेची रिट याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती रमेश धनुका यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ किंवा न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या विषयावरून दोन्हीही गटात चांगलीच जुंपली असून यावर काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनेही भाष्य केले आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांनीही शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी मागणी केली आहे.
उद्धव साहेबांनी आणखी काही दिवस परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. दसरा मेळाव्याची वेळ जवळ आली आहे, ५ ऑक्टोबरला हा मेळावा होणार आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयात जाऊन परवानगी घेण्यात यावी. यापूर्वीही अशाप्रकारे परवानग्या घेण्यात आल्या आहेत. शिंदे गटाला बीकेसी येथे मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. मग शिवाजी पार्कची जागा उद्धव ठाकरे यांना मिळावी. राज्यातील जनतेला दोघांचेही विचार ऐकायला मिळावेत, असे अजित पवार यांनी म्हटले होते.