MaharashtraPoliticalUpdate : मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार , म्हणाले वेळ आल्यावर सगळे सांगेन… !!

नवी दिल्ली : शिवसेनापक्ष प्रमुख यांच्या भाषणातील अंगाराचे चटके बसताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीतून उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे . उद्धव ठाकरेंनी राज्यात बाप पळवणारी टोळी सक्रीय असल्याची टीका केली होती. याला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी, मग आम्ही तुम्हाला बापाचा विचार विकणारी टोळी म्हणावे का ? असा सवाल केला. तर आम्ही “मिंधे गट ” नाही तर बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे असल्याचा पुनरुच्चार केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित एका सभेला संबोधित करत होते. यावेळी शिंदे यांनी बंडामागचे कारण आणि तत्कालीन परिस्थितीचा पुनरुच्चार करत उद्धव ठाकरे यांनी केलेले वार तत्काळ पलटवून लावले. अडीच वर्षानंतर गटप्रमुखांची आठवण आली का, असा रोकडा सवाल एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना केला. आम्हाला ‘खोके’ बोलत आहात, वेळ आल्यावर सगळे सांगेन. माझ्याशिवाय चांगला हिशेब कुणाकडे असणार, ते मी दिल्लीत नाही महाराष्ट्रात सांगणार, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे.
शिंदे म्हणाले कि , महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज होती. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गानं पुढे जाण्याचा विचार केला होता.
शिवसेनेच्या इतर राज्यातील प्रमुखांना भेट मिळत नव्हती. त्या लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना पुढं नेण्याचं तुम्ही काम केल्याचं सांगितलं. आम्ही केलेल्या परिवर्तनाची दखल जगातील ३३ देशांची दखल घेतली. ही संघर्षाची लढाई आम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी केली नाही. माझ्यासह ९ मंत्र्यांनी सत्ता सोडून हा निर्णय घेतला. सत्ता सोडून आम्ही हा निर्णय घेतला. देशातील आणि जगातील अनोखं उदाहरण होतं की आम्ही लोकांनी सत्तेचा त्याग केला. आम्हाला मुख्यमंत्री व्हायची अपेक्षा नव्हती,असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी भाजपला बाहेर ठेवत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापनकेल्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करीत शिंदे म्हणाले कि , अडीच वर्षात अनेक कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करुन आमच्या लोकांना तडीपार करण्यात आले. शिवसेना आणि भाजपनं सोबत निवडणूक विधानसभा लढवली. एका ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला होता. आम्ही लोकांपुढं हिंदुत्वाची भूमिका घेऊन गेलो होतो. लोकांनी आमची भूमिका स्वीकारुन भाजप आणि सेनेच्या युतीला कौल दिला. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवली. शिवसेना आणि भाजपचं सरकार स्थापन व्हावं असं लोकांना वाटत होतं. त्यामुळे लोकांना विश्वास देखील वाटत नव्हता की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबत आघाडी होईल,.
मी देनेवाला आहे म्हणून मुख्यमंत्री बनलो….
आम्हाला मिंधे गट म्हणताय मात्र आम्ही बाळासाहेबांचे खंदे समर्थक आहोत. दोन्ही काँग्रेससोबत तुम्ही सत्तेसाठी मिंधेपणा केला. आम्हाला आस्मान दाखवणार म्हणालात, तीन महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला आस्मान दाखवले आहे. आम्हाला मिरचीचा ठेचा देणार, अहो आम्ही ठेचा खाऊनच मोठे झालो, म्हणूनच आम्ही त्यांना ठेचले आहे. ये पब्लिक है सब जानती है, गद्दार कोण खुद्दार कोण? जनता जाणते. त्यांना आरोप प्रत्यारोप करत राहू द्या, दोन्ही काँग्रेससोबत तुम्ही गेलात म्हणून जनतेने तुम्हाला नाकारले आहे. मुख्यमंत्री झाल्यावर एका तरी गट प्रमुखाला रोजगार मिळाला का? त्यांना मुंबईत येणे-जाणेही परवडत नव्हते. कधी त्यांचा विचार केला का? मी नगरविकास खात्यातून १-२ कोटी निधी दिला आणि काम करा म्हणून सांगितले. मी देण्याचे काम करतो, काही जण फक्त घेण्याचे काम करतात. मी देनेवाला आहे म्हणून मी मुख्यमंत्री बनलो.