BeedNewsUpdate : राष्ट्रवादीचे सक्रिय सदस्य बनण्यासाठी विशेष अभियान : बाजीराव धर्माधिकारी

परळी : माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय सदस्य नोंदणीसाठी आ. मुंडे यांच्या जगमित्र या संपर्क कार्यालयात शनिवार व रविवार असे दोन दिवसीय सक्रिय सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानात राष्ट्रवादी काँग्रेस चे सदस्य होऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत सक्रिय सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे. मागील तीन महिन्यांमध्ये आ. धनंजय मुंडे यांनी स्वतः हे अभियान सक्रियपणे राबवत परळी शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांशी घरोघर संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवत मोठ्या प्रमाणावर सक्रिय सदस्यांची देखील नोंदणी केली होती.
या नोंदणी केलेल्या सदस्यांचे फॉर्म एकत्र संकलित करणे, तसेच नवीन सक्रिय सदस्यांची नोंदणी करणे यासाठी शनिवार (दि. १७) व रविवार असे दोन दिवस विशेष अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी केली जाणार असल्याचे बाजीराव धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.