Aurangabad News Update : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आज औरंगाबाद दौऱ्यावर….

औरंगाबाद : केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे शुकव्रार, दि.16 सप्टेबर, 2022 रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि.16 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 07.00 वा. मुंबई येथून विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. 08.10 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मोटारीने सुभेदारी शासकीय विश्रामगृह औरंगाबादकडे प्रयाण. 08.30 वा. सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे राखीव. 10.00 वा. किरण चव्हाण यांचे कुटूंबियांशी सांत्वनपर भेट. (स्थळ : खिर्डी ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद). 11.30 वा. श्री.कसारे यांचे कुटूंबियांशी सांत्वनपर भेट. (स्थळ : पिसादेवी, ता.जि.औरंगाबाद). दुपारी 12.30 वा. स्वर्गीय श्री.प्रशांत शेगावकर यांचे निधाबद्दल शोकसभेस उपस्थिती. (स्थळ : क्रांती नगर, अदालत रोड, जिल्हा न्यायालयाच्या मागे, औरंगाबाद). 02.15 वा. समाज कल्याण अधिकारी यांचे सोबत बैठक (स्थळ : सुभेदारी शासकीय विश्रामगृह औरंगाबाद). 02.30 वा. पत्रकार परिषद (स्थळ : सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद) 04.00 वा. औरंगाबाद येथील स्थानिक नेत्यांशी संवाद (स्थळ : सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद). सायंकाळी 06.30 वा. औरंगाबाद विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.