IndiaCricketUpdate : अफगाणिस्ताविरुद्ध खेळताना बरसला विराट , ६१ चेंडूंमध्ये ठोकले ७१ वे शतक …

दुबई : यूएई येथे सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात भारतीय बल्लेबाज विराट कोहलीने ६१ चेंडूंमध्ये १२२ धावा केल्या. बऱ्याच प्रतीक्षेनंतर विराट कोहलीने दमदार शतक झळकावले आहे. आपले हे शतक त्याने आपली पत्नी अनुष्का आणि कन्या वामिका यांना समर्पित केले आहे.
आज अफगाणिस्तान विरोधातील सामन्यात भारताचा स्टार फलंदाज चांगलाच बरसला. त्याने साधारण दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकी खेळी केली आहे. खरे तर भारताचे आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आलेले आहे. असे असले तरी आजच्या औपचारिक सामन्यात मात्र विराटने धडाकेबाज फलंदाजी करत भारतीयांचे मन जिंकले. त्याने आपले ७१ वे शतक झळकावले आहे. ही कामगिरी त्याने ५३ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि ४ षटकार यांच्या जोरावर केली आहे.
दरम्यान विराट कोहलीचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१ वे शतक ठरले. या शतकासह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगशी बरोबरी केली आहे.
शतक ठोकल्यानांतर बोलला विराट…
आपल्या या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना कोहली म्हणाला की, ” “गेल्या अडीच वर्षांनी मला खूप काही शिकवलं. मी एका महिन्यात ३४ वर्षांचा होणार आहे. त्यामुळे यापूर्वी मी ज्यापद्धतीने आक्रमक सेलिब्रेशन करायचो, तसे आता करणार नाही. खरं तर मला धक्का धक्का बसला होता. माल वाटलं की हा शेवटचा प्रकार माझ्यासाठी शिल्लक राहीलेला आहे. पण या काळात मला संघाने चांगली मदत केली. जेव्हा मी शतक झळकावलं तेव्हा मी माझी रिंग पहिल्यांदा किस केली. मी इथे उभा आहे ते फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीमुळे, ती व्यक्ती म्हणजे अनुष्का. प्रत्येकवेळी ती माझ्याबरोबर उभी राहीली. त्यामुळे हे शतक मी तिला समर्पित करतो आणि त्याचबरोबर माझी लहान मुलगी वामिकालाही हे शतक समर्पित करतो. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर कायम असते तेव्हा काही गोष्टी सोप्या होतात. जेव्हा मी संघात परतलो त्यापूर्वी मी सहा आठवड्यांची सुट्टी घेतली होती. या सुट्टीमध्ये मी किती थकलो आहे, हे मला जाणवले. या एका ब्रेकमुळे मला पुन्हा एकदा खेळाचा आनंद लुटता आला.”