IND vs AFG Asia Cup 2022 Live : १०१ धावांनी भारत जिंकला , अफगाणिस्तानचा संघ गारद ….

Live Score
अफगाणिस्तान : ११८/८ ( २० ) । भारत : २१२/२ ( २० )
दुबई : आशिया चषक स्पर्धेत यूएईमध्ये सुरू असलेल्या सुपर-४ फेरीतील सामन्यात आज भारत – अफगाणिस्तान यांची लढत चालू आहे. याआधी भारताने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरोधातील सलग दोन सामने गमावल्यामुळे अफगाणिस्तान बरोबरच भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. दरम्यान, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने दमदार फलंदाजी करीत विराट कोहलीची शतकीय आणि केएल राहुलच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानसमोर २१३ धावांचे आव्हान ठेवले आहे.
दरम्यान विराटने या सामन्यात आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१ वे शतक पूर्ण केले. कोहलीने ५३ चेंडूंत ११ चौकार आणि चार षटकारांसह १०० धावा पूर्ण केल्या. कोहलीचे हे ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. कोहलीला यावेळी हंगामी कर्णधार लोकेश राहुलने यावेळी ६२ धावांची खेळी साकारली. पण कोहलीने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आणि त्यामुळेच भारताला २१२ धावांचे लक्ष्य अफगाणिस्तानच्या संघासमोर ठेवता आले. कोहलीने यावेळी ६१ चेंडूूंत १२ चौकार आणि सहा षटाकरांच्या जोरावर नाबाद १२२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी यावेळी भारताला ११९ धावांची सलामी दिली. ही सलामी म्हणजे भारताच्या विजयाचा पाया असल्याचे म्हटले जात होते. पण राहुल बाद झाला आणि ही जोडी फुटली. राहुलने यावेळी ४१ चेंडूंत ६ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६२ धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. या सामन्यात त्याला ६ धावांवर समाधान मानावे लागले. पण एका बाजूने कोहली दमदार फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने आपले अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर तो गोलंदाजीवर तुटून पडला. सूर्यकुमार बाद झाल्यावर त्याला रिषभ पंतची साथ मिळाली.
यांना विश्रांती आणि आणि यांना संधी …
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले. रोहित शर्माला यावेळी संघाबाहेर करण्यात आले. त्यामुळे भारताचे कर्णधारपद कोण सांभाळणार हा मोठा प्रश्न होता. पण भारतीय संघाने या प्रश्नाचे उत्तर सोडवले आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद या सामन्यासाठी लोकेश राहुलला देण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय संघात अजून तीन बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघात दिनेश कार्तिक, दीपक चहर आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली आहे. भारतीय संघातून रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि युजवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे.