MumbaiNewsUpdate : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात “गुफ्तगू” …

मुंबई : राज्यातील सत्ता स्थापनेनंतर भाजपने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची स्थिती अधिक मजबूत करण्याची तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे मनसेलाही भाजपची साथ हवी आहे. यादृष्टीने देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक निर्माण झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या बंगल्यावर भेट घेतली आहे.
या आधी जुलै महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते. राज ठाकरेंवर त्यावेळी नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. दरम्यान राज्यात झालेल्या सत्तांतरात देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीसांचं कौतुक करणारे पत्र त्यांना पाठवले होते.
या पत्रामध्ये “पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिले . पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात टेवण्यासाठी आहे. खरोखरच अभिनंदन”, अशा शब्दांत फडणवीसांचे अभिनंदन केले होते.