Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

DelhiNewsUpdate : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतःच सिद्ध करताहेत आज त्यांचे बहुमत ….

Spread the love

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज सभागृहात प्रस्तावित विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. दिल्लीतील आम आदमी पार्टी (आप) सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याच्या दाव्यांदरम्यान हे काम केले जात आहे. सकाळी ११ वाजता सभागृह सुरू होताच अरविंद केजरीवाल हे प्रस्ताव मांडतील.


आपल्या पक्षात कुठलीही फूट नाही हे सिद्ध करण्यासाठी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीच हा विश्वासदर्शक ठरावाचा प्रस्ताव मांडला होता. दरम्यान पक्षाच्या वतीने आरोप करण्यात आला आहे कि ,  भाजपने त्यांच्या पक्षाच्या आमदारांना पक्ष बदलण्यासाठी २० कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.

दरम्यान सीबीआयने राजधानीच्या मद्य धोरणात घोटाळा केल्याचा आरोप असलेले त्यांचे उपमुख्यमंत्री  मनीष सिसोदिया यांनी दावा केला की त्यांनी  ‘आप’ सोडल्यास त्यांचे “सर्व खटले बंद” करण्याची ऑफर दिली होती. गेल्या आठवड्यात, अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांसह महात्मा गांधींच्या स्मारक राजघाटावर प्रार्थना केली, त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली, ज्यात दिल्लीतील ६२ आमदारांपैकी ५३ उपस्थित होते, तर इतर आमदार यावेळी व्हर्चुअल पद्धतीने उपस्थित होते.

केजरीवाल म्हणाले की, ते त्यांच्या आमदारांसह राजघाटावर भाजपचे ऑपरेशन लोटस अयशस्वी झाल्याबद्दल प्रार्थना करण्यासाठी गेले होते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या धर्तीवर भाजपचे सरकार पाडण्यासाठी ‘ऑपरेशन लोटस’चा कट रचल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. “मी ऐकले आहे की ते ४० आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न करत आहेत. मला आनंद आहे की एकाही आमदाराने हार मानली नाही,” असे केजरीवाल म्हणाले.

आपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या “प्रशंसनीय” कार्यासाठी लोकप्रियता मिळविणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना “धमकावण्यासाठी” केंद्रीय एजन्सीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. भाजपने मात्र आपचे आरोप फेटाळून लावले आणि आरोप केला की ते आपल्या सरकारमधील भ्रष्टाचारापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान उपराज्यपालांनी गेल्या महिन्यात सीबीआय चौकशीची शिफारस केली होती आणि ‘आप’ने खाजगी मद्यविक्रेत्यांना फायदा होण्यासाठी अबकारी धोरण आणल्याचा आरोप केला होता. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत आपचे ६२ आमदार आहेत. भाजपकडे आठ असून बहुमतासाठी आणखी २८ जणांची गरज आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!