IndiaFinancialUpdate : UPI व्यवहारावर पेमेंट शुल्क लागणार कि नाही ? सीतारामन यांनी दिले उत्तर …

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकार डिजिटल पेमेंट शुल्क आकारणार कि नाही याचा खुलासा एका कार्यक्रमादरम्यान केला आहे. सीतारामन म्हणाल्या कि , “आम्ही डिजिटल पेमेंट्स हे सार्वजनिक हित म्हणून पाहतो. भारतीय अर्थव्यवस्थेचे डिजिटलायझेशन अधिक आकर्षक व्हावे म्हणून लोकांना त्यात मुक्तपणे प्रवेश करता आला पाहिजे. तसेच, डिजिटायझेशनच्या माध्यमातून आम्ही पारदर्शकता प्रदान करत आहोत ज्याची खूप गरज आहे.”
त्या पुढे म्हणाल्या , “आम्हाला अजूनही वाटते की हे शुल्क आकारण्याची ही योग्य वेळ नाही. आम्ही अधिकाधिक मुक्त डिजिटल व्यवहार, डिजिटायझेशन आणि प्लॅटफॉर्मकडे वाटचाल करत आहोत ज्यामुळे लोकांना सहज पेमेंट करता येईल.”
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे केलेल्या व्यवहारांवर टायर्ड शुल्क आकारण्याच्या शक्यतेसह पेमेंट सिस्टममध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) प्रस्तावित केलेल्या विविध बदलांवर जनतेकडून अभिप्राय मागवण्याच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांचे विधान आले आहे.
विशेष म्हणजे, भारत सरकारने गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की ते UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) सेवांवर कोणतेही शुल्क आकारणार नाही.