IndiaNewsUpdate : इंद्र्कुमारच्या हत्येवर बोलल्या मीराकुमार , देशात १०० वर्षांनंतरही जातीच्या आधारावर भेदभावाच्या घटना…

नवी दिल्ली : देशात जातीच्या आधारावर भेदभाव करण्याच्या घटना अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीत. राजस्थानमध्ये एका दलित मुलाला मडक्यातून पाणी प्यायल्याच्या कारणावरून वरच्या वर्गातील शिक्षकाने बेदम मारहाण केली. लोकसभेच्या माजी अध्यक्षा आणि काँग्रेस नेत्या मीरा कुमार यांनीही कबूल केले की, देशात अजूनही जातीच्या आधारावर भेदभावाच्या घटना सुरू आहेत.
राजस्थानमधील या धक्कादायक घटनेचा संदर्भ देत मीरा कुमार यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “१०० वर्षांपूर्वी माझे वडील बाबू जगजीवन राम यांनाही शाळेत सवर्णाच्या भांड्यातून पाणी पिण्यापासून रोखण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला झाला नाही हा एक चमत्कार होता. ते वाचले.” त्यांनी पुढे लिहिले की, आज याच कारणामुळे एका ९ वर्षांच्या दलित मुलाची हत्या करण्यात आली. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही जातीवाद हाच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. हा कलंक आहे.”
100 वर्ष पहले मेरे पिताजी बाबू जगजीवन राम को स्कूल में सवर्णो के घड़े से पानी पीने से रोका गया था। किसी तरह उनकी जान बच गई।
आज, इसी वजह से एक 9 वर्ष के #दलित बच्चे को मार दिया गया।
आज़ादी के 75 वर्षों के बाद भी #जातिवाद हमारा सबसे बड़ा शत्रु है। कलंक है।
— Meira Kumar (@meira_kumar) August 15, 2022
२१ व्या शतकातही १०० वर्षांपूर्वीच्या घटना घडताहेत…
२१ व्या शतकातही दलितांसोबत होत असलेल्या भेदभावाच्या मुद्द्यावर एनडीटीव्हीसमोर बोलताना मीरा कुमार म्हणाल्या, “जे काही घडले ते अतिशय भयावह आहे. १०० वर्षांपूर्वी याच कारणावरून माझे वडील वाचले होते, परंतु १०० वर्षांनंतरही याच कारणावरून मुलाचा जीव गेला. त्या म्हणाल्या , “मी एकदा माझ्या वडिलांना बाबू जगजीवन राम यांना विचारले, तुम्ही या देशाच्या स्वातंत्र्यासाठी का लढले? तुम्ही ही जोखीम का पत्करली? या देशाने तुमच्यासाठी आणि दीनदलितांसाठी काहीही केले नाही, तुम्हाला अपमानाला सामोरे जावे लागले. आणि अत्याचार सहन करावे लागले , तेव्हा ते म्हणाले होते की स्वतंत्र भारत बदलेल.जातीविरहित समाज मिळेल. पण बरेच झाले कि , अशा घटना पाहण्यासाठी ते आज हाय्यात नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी भारत या बाबतीत बदललेला नाही. मी खूप दुःखी आहे.”
लंडनमध्येही मला घर मिळाले नाही…
आजही तुम्हाला तुमच्या कर्तृत्वापेक्षा तुमच्या जातीच्या आधारावर जास्त ओळखले जाते यावर तुमचा विश्वास आहे का, यावर मीरा कुमार म्हणाल्या, “होय, माझ्या वडिलांनी अनेक अडचणी असतानाही खूप काही मिळवले पण तरीही ते दलित नेते म्हणून ओळखले जातात. फक्त भारतातच नाही तर लंडनमध्येही मला अपमानाला सामोरे जावे लागले.मी तिथे राहण्यासाठी घर शोधत होते. एक व्यक्ती जो हिंदूही नव्हता, तो ख्रिश्चन होता. मिस्टर जेकब. त्याने मला त्याचे घर भाड्याने देण्याची तयारी दर्शविली त्यावर मी म्हटले कि , मग मी शिफ्ट होऊ का ? या दरम्यान त्यांनी माझ्यावर शेवटचा प्रश्न डागला कि. तुम्ही ब्राह्माण आहात का ? त्यावर मी म्हटले कि नाही , मी अनुसूचित जातीची आहे तुम्हाला काही अडचण आहे का ? त्यावर तो नाही म्हणाला पण मला घरही दिलं नाही.
बाबू जगजीवनराम यांचा अनुभव…
मीरा कुमार म्हणाल्या, “माझ्या वडिलांनाही अशा परिस्थितीचा सामना करावा लागला. माझे वडील देशाचे उपपंतप्रधान होते, १९७८ साली ते बनारसला डॉ. संपूर्णानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेले होते. तिथे त्यांचा अपमान झाला, ते उपपंतप्रधान होते, त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली होते , तरीही त्यांच्या विरोधात जातीवाचक अपमानास्पद शब्द वापरले गेले. “जगजीवन *** चले जावो..” आणि नंतर मूर्तीला गंगाजलाने धुतले गेले. त्यांची मान्यता अशी होती बाबू जगजीवनराम यांच्यामुळे मूर्ती ‘अपवित्र’ झाली…