Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : चर्चेतली बातमी : मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना ट्विटरवरून असाही दणका … !!

Spread the love

मुंबई : राज्यात खरी शिवसेना कुणाची यासाठी न्यायालयीन भांडण चालू असतानाच आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा थेट  ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करून मोठा दणका दिला आहे.  नुकत्याच हाती आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर शिंदे यांनी हे ट्विट केले आहे. यावरून शिवसेना काय प्रतिक्रिया देणार ? असा प्रश्न या निमित्ताने झाला उपस्थित झाला आहे. 

“राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती सरकारला जनतेचा कौल मिळाला आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारराजाचेही अभिनंदन व आभार..”  असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये एक पोस्टरही शेअर केलं आहे. या पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो आहेत. राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निकालाची आकडेवारी देताना एकनाथ शिंदेंनी भाजपाला ८२, शिवसेना ४०, उद्धव ठाकरे गट २७, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस २२ आणि इतरांना ४७ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्याचं म्हटलं आहे.

विशेष म्हणजे या ट्विटच्या आधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा न करता ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री’ असा केला होता. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करत परस्पर नवी जाहीर केली. त्याचप्रमाणे धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासह शिवसेनेवर दावा सांगण्याचा प्रयत्नही शिंदेंनी केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!