SanjayRautNewsUpdate : संजय राऊत यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ

मुंबई : ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम आणखी ४ दिवस वाढला आहे.
पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांना यापूर्वी १५ दिवसांची कोठडी ईडीने मागितली होती. मात्र, न्यायालयाने केवळ ४ दिवसांची कोठडी दिली होती हि कोठडी आज संपत असल्याने ईडीने त्यांना आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करीत १० ऑगस्ट पर्यंत कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती. आम्हाला आणखी काही महत्त्वाची कागदपत्रे तपासायची आहेत. जे अलिबागमधील जमिन व्यवहाराशी संबंधित आहेत, असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. मात्र, न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी वाढवून दिली आहे.
दरम्यान, मला ह्रदयविकाराचा त्रास असूनही मला जिथे ठेवलंय तिथं व्हेंटिलेशन नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावर, राऊत यांना एसी रुममध्ये ठेवले असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. संजय राऊत यांच्यावर सगळे आरोप जुनेच आहेत, यात नवीन काहीही नाही. तसेच, त्यांच्यावरील आरोप आणि ही कारवाई राजकीय हेतुने करण्यात आल्याचे राऊतांचे वकिल मनोज मोहिते यांनी न्यायालयात म्हटले आहे.न्यायालयात येण्यापूर्वी संजय राऊत हे त्यांच्या भावाला बोलत उभेराहिल्याने ईडीचे अधिकारी आणि संजय राऊत यांच्यात काही काळ हुज्जत झाली त्यानंतर त्यांना न्यालयात नेण्यात आले. यावेळी ईडीच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.