Maharashtra News Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाचव्यांदा दिल्ली दौऱ्यावर…

मुबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पूर्णतः ॲक्टीव्ह मोडमध्ये असून त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पाचव्यांदा दिल्लीकडे . आज सायंकाळी सात वाजता दिल्लीकडे रवाना होत असल्याचे वृत्त आहे.
रात्री ९ वाजता ते महाराष्ट्र सदन येथे पोहोचणार आहेत. आपल्या या दौऱ्यात ते भाजप नेत्यांच्या भेटी घेऊन आगामी रणनितीवर चर्चा करतील असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत नसतील. निवडणूक आयोगाचे प्रकरण तसेच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी तसेच आगामी मंत्रिमंडळ विस्तार यावर या दौऱ्यात भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी ते चर्चा करण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून त्यांचा हा पाचवा दिल्ली दौरा आहे. पहिल्या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. दुसऱ्या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर खासदारांची भेट घेतली होती. तिसऱ्या दौऱ्यात त्यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समारोपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तर चौथ्या दौऱ्यात ते नवीन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिले होते.