Aurangabad Crime Update : मोटरसायकल चोरीचा प्रयत्न, नागरिकांनी बदडले

औरंगाबाद- मनमाडहून घरफोडी करुन शहरात आलेले चोरटे मोटरसायकल चोरतांना नागरिकांना दिसताच त्यांना चांगलेच बदडून काढले.
रोहित राजू घुले(१९) व रोहित शत्रूघ्न पवार(२१) रा.दोघेही भारतनगर गारखेडा अशी चोरट्यांची नावे आहेत. शिवाजीनगरातील मंथन शिरसाठ यांची गाडी चोरटे ओढूननेत असल्याचे मंथन ने पाहिले.शिरसाठ यांनी शेजार्यांना फोन करुन त्यांच्या मदतीने चोरटे पकडले व बेदम चोप दिला.त्यातून सुटकाकरुन घेतांना चोरटे रस्त्यात पडले.जखमी झाले हे प्रकरण पोलिस निरीक्षक गांगूर्डे यांना कळताच त्यांनी पथक पाठवून चोरटे ताब्यात घेतले.
पोलिसांना चोरट्यांनी दिलेल्या जबाबात म्हटले की, दोन दिवसांपूर्वी ते पालघरला गेले होते.तेथून मनमाडमार्गे शहरात येतांना घरफोडी करंत ,कार चोरुन शहरात परतले.पोलिसांनी चोरट्यांच्या ताब्यातून कार आणि सोन्याचांदीचे दागिने जप्त केले. वरील कारवाई पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय खटाने, पीएसअय बनसोडे, पोलिस कर्मचारी वैराळकर, चौरे यांनी पार पाडली