PresidentialElectionResults : LiveUpdate : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल : द्रौपदी मुर्मू यांना 540 तर यशवंत सिन्हा यांना 204 मते

दुसऱ्या टप्प्यातील मतमोजणी पूर्ण, द्रौपदी मुर्मू यांना 1349 तर यशवंत सिन्हा यांना 537 मते मिळाली आहेत.
राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर मिळालेल्या माहितीनुसार, खासदारांच्या एकूण 748 वैध मतांपैकी 540 मते द्रौपदी मुर्मू यांना तर 204 मते विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना मिळाली आहेत. 15 मते अवैध ठरविण्यात आली आहेत.
नवी दिल्ली : देशाचे 15 वे राष्ट्रपती कोण होणार, याचा निर्णय आज होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान झाले असून आज सकाळी 11 वाजता येथील संसद भवनात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. द्रौपदी मुर्मू सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) तर यशवंत सिन्हा विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. मुर्मू यांच्या विजयाची दाट शक्यता आहे. जर त्या जिंकल्या तर त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनतील.
देशाचे विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार असून नवीन राष्ट्रपती 25 जुलै रोजी शपथ घेतील. सर्व राज्यांतील मतपत्रिका संसद भवनात आणण्यात आल्या आहेत. संसदेच्या ६३ क्रमांकाच्या खोलीत मतमोजणीसाठी निवडणूक अधिकारी सज्ज झाले आहेत. या सभागृहात चोवीस तास बॅलेट पेपरची सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता
निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी, राज्यसभेचे सरचिटणीस पीसी मोदी गुरुवारी मतमोजणीचे निरीक्षण करतील. सायंकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मोदी प्रथम सर्व खासदारांच्या मतांची मोजणी केल्यानंतर निवडणुकीच्या ट्रेंडची माहिती देतील आणि त्यानंतर 10 राज्यांची मते वर्णमालानुसार मोजल्यानंतर पुन्हा माहिती शेअर करतील.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संसद भवनासह ३१ ठिकाणी आणि विधानसभेतील ३० केंद्रांवर मतदान झाले होते . अनेक राज्यांत मुर्मूच्या बाजूने ‘क्रॉस व्होटिंग’ झाल्याच्या बातम्याही आल्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सदस्यांना व्हिप जारी केला जात नाही. या निवडणुकीत संसद, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य आणि नामनिर्देशित खासदार वगळता सर्व राज्यांच्या विधानसभेचे सदस्य राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले आहे.
99 टक्क्यांहून अधिक मतदारांनी केले मतदान
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 776 खासदार आणि 4,033 निवडून आलेल्या आमदारांसह एकूण 4,809 मतदार मतदानासाठी पात्र होते. नामनिर्देशित खासदार आणि आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य यामध्ये मतदान करू शकत नाहीत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सोमवारी झालेल्या मतदानादरम्यान 99 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदान केले.
दरम्यान भारतीय जनता पक्षाचे खासदार सनी देओल आणि संजय धोत्रे यांच्यासह आठ खासदारांना मतदान करता आले नाही. मतदानादरम्यान देओल उपचारासाठी परदेशात गेले आहेत, तर धोत्रे आयसीयूमध्ये दाखल आहेत. सोमवारी भाजप आणि शिवसेना, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि एआयएमआयएमच्या प्रत्येकी दोन आमदारांनी मतदान केले नाही.
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 2017 मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक एकूण 10,69,358 पैकी 7,02,044 मते मिळवून जिंकली होती. त्यांच्या प्रतिस्पर्धी मीरा कुमार यांना केवळ 3,67,314 मते मिळाली होती.
२० हजार लाडू आणि स्वागतासाठी १०० बॅनर…
Sweets prepared, victory processions planned in Droupadi Murmu's native village ahead of Presidential poll results
Read @ANI Story | https://t.co/Nn4Ca8naPy#Presidentialresults #DroupadiMurmu #Presidentialpolls pic.twitter.com/6yZEtXoBBs
— ANI Digital (@ani_digital) July 20, 2022
राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी ओडिशातील रायरंगपूरमध्येही विजयोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रपतीपदाचा निकाल लागल्यानंतर मिठाई वाटण्यात येणार असून त्यासाठी रायरंगपुरात लाडू बनवायला सुरुवात झाली आहे. एवढेच नाही तर विजयानंतर मुर्मू यांची विजयी मिरवणूक काढण्याची तयारीही करण्यात आली आहे. भाजपाचे स्थानिक नेते तपन महंता यांनी सांगितले की, २० हजार लाडू बनवले जात आहेत. १०० बॅनरही करण्यात आले आहेत.