IndiaNewsUpdate : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर फेकला गावठी बॉम्ब…

कन्नूर : मंगळवारी पहाटे केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पयन्नूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यालयावर गावठी बॉम्ब फेकण्यात आला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, घटनास्थळावरील फुटेजवरून असे दिसून आले आहे की हल्ल्यात इमारतीच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत.
Kerala | Visuals from RSS office in Payyannur, Kannur which was allegedly bombed early this morning, leaving the window glass broken pic.twitter.com/ALjpuXNH2K
— ANI (@ANI) July 12, 2022
या घटनेची माहितीमिळताच पय्यान्नूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर अतिरिक्त तपासासाठी परिसर सील करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तींनी बॉम्ब फेकल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. कार्यालयातील फर्निचरचंही नुकसान झाल्याचं कार्यालयामधील फोटोंमध्ये दिसत आहे. सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे प्राथमिक तपास हाती घेण्यात आला असून हे कृत्य कोणी केलं याचा शोध घेतला जात आहे.