ShivsenaNewsUpdate : शिवसेनेच्या खासदारांनाही बंडात सामील करण्यासाठी दिल्लीत विशेष भोज …मुख्यमंत्री पुत्राचे सारथ्य !!

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शिवसेनेच्या आमदारांना घेऊन मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दिल्लीत त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या खासदारांनाही फोडण्याचे प्रयत्न चालू आहेत. या निमित्ताने दिल्लीत शिवसेना नेते कृपाल तुमाणे यांच्या घरी काल शुक्रवारी विशेष भोज आयोजित कारण्यातले होते. यावेळी शिवसेनेचे १० खासदार उपस्थित असल्याचे वृत्त आहे. यावेळी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावर चर्चा झाली.
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, भावना गवळी यांच्यासह आणखी ८ खासदार या भोजनाला उपस्थित होते, असे वृत्त न्यूज १८ लोकमतने दिले आहे. शिवसेनेतील एकूण १५ खासदार शिवसेनेतून फुटून शिंदे गटामध्ये सहभागी होऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या खासदारांशी चर्चा करण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दरम्यान या आधी शिवसेचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्ष प्रमुखांना पत्र लिहून राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यावर खासदारांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.