ShivsenaNewsUpdate : पक्षविरोधी कारवाया , सेनेतून दोघांची हकालपट्टी

मुंबई : शिवसेनेविरुद्ध बंड करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा धडाका आता शिवसेना नेतृत्वाने सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शिवसेना नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये विजय चौगुले, विजय नाहटा या नेत्यांचा समावेश आहे. रुवारी या दोघा नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला होता. विजय चौगुले हे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत तर विजय नाहटा हे राज्य पर्यावरण समितीचे अध्यक्ष आहेत. या दोघांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षातून हकालपट्टी केल्याचे सामना वृत्तपत्रातून जाहीर करण्यात आले आहे.