MaharashtraNewsUpdate : निवडणूक आयोगाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विठ्ठल पूजेची परवानगी…

पंढरपूर : राज्यात आचारसंहिता सुरु झाल्यामुळे आषाढीच्या विठ्ठलाच्या महापूजेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार कि नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. मात्र त्य्यांच्या या पंढरपूर दौऱ्याला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे अखेर आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा ही एकनाथ शिंदेंच्या हस्तेच होणार हे नक्की झाले आहे. उद्या रविवारी पहाटे ते ठरल्याप्रमाणे पांडुरंगाची पूजा करतील. दिल्लीहून ते पुण्यात आणि नंतर पंढरपुरात पोहोचतील.
राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाल्याने या आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूजेसाठी विशेष परवानगी मागितली होती. त्यांच्या विनंतीली निवडणूक आयोगाने सशर्त परवानगी दिली आहे.
या तीन अटींचे कर्वे लागेल पालन
१. पूर्वनियोजित शासकीय कार्यक्रमांमध्ये कोणत्याही निधी विकास योजना, कार्यक्रमांची घोषणा करू नये.
२. वरील सर्व कार्यक्रमांसाठी आवश्यक त्या नियमानुसार परवानग्या घेण्यात याव्यात.
३. कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यास हरकत नाही, पण त्या ठिकाणीही उपरोक्त अटींचे पालन करण्यात यावे.
दरम्यान पंढरपूरच्या विश्रामगृहात पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी याचा समारोप सोहळा होणार आहे. एकादशीच्या दिवशी पहाटे शासकीय महापूजा झाल्यावर पहाटे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता सुंदर माझे कार्यालय, स्वच्छता दिंडी समारोप आणि दुपारी मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास हजेरी लावणार आहेत.