MaharashtraPoliticalUpdate : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत , घेणार पंतप्रधानांची भेट …

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले असून उद्या पंतप्रधान मोदी यांची ते भेट घेणार आहेत.
दरम्यान न्यायालयाच्या विषयावर बोलताना ते म्हणाले कि , उद्धव ठाकरे याआधीही एकदा कोर्टात गेले होते पण कोर्टाने त्याला स्थगिती दिली नाही. न्यायालयावर आमचा विश्वास आहे, न्यायालय योग्य तो निकाल देईल. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करू असे महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले असून आज रात्रीच ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. याशिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, भाजप प्रमुख जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेणार आहेत.