AurangabadCrimeUpdate : बायकोला माहेरी पाठवण्याच्या रागातून मुलाचा पित्यावर तलवारीने हल्ला….

औरंगाबाद – बायकोला माहेरी पाठवण्यास परवानगी दिल्यामुळे चिडलेल्या मुलाने वडलांवर आज सकाळी ११ वा.आल्तमश कॉलनी मध्ये तलवारीने वार करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी जिनसी पोलिसांनी नारेगावातून आरोपीला अटक केली. शेख आमेर शेख इरफान (२१) रा. रहिमनगर अल्तमश कॉलनी असे अटक आरोपीचेनाव आहे. तर शेख इरफान शेख गफार (४३) असे जखमी पित्याचे नाव आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , आरोपी हा वाहनांवर सीट कव्हर बसवण्याचे काम करतो. रविवारी सकाळी त्याची पत्नीने सासरे शेख इरफान यांना विचारून माहेरी निघण्याची तयारी करत होती . त्यावर आरोपी पती शेख आमेरने कुठे निघाली असे विचारताच, तिने माहेरी जात आहे असे सांगितल्यामुळे मला न विचारता कशीकाय चालली ? असे विचारताच सासऱ्यांनी परवानगी दिल्याचे सांगताच चिडलेल्या आमेरने वडिलांना हातात तलवार घेत जाब विचारला व पाठीवर डोक्यावर वार करून घरातून पळून गेला.
दरम्यान जखमी इरफान यांनी जिनसी पोलिसात तक्रार दिल्या नंतर पोलीस निरीक्षक अंनता तांगडे यांनी आरोपीचे मोबाईल लोकेशन चेक केले असता तो नारेगावात फिरत असल्याचे लक्षात आले . त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अंनता तांगडे यांनी पथकासह नरेगावातून आरोपी आमेर ला अटक केली . वरील का रवाईत पोलीस कर्मचारी नंदलाल चव्हाण,बाशीद पटेल, शेख जाफर, संतोष शंकपाळ यांनी पार पाडली . पुढील तपास पीएसआय शेख अशपाक करत आहेत.