IndiaNewsUpdate : कसा हा “राम” ? ज्याने “द्रौपदी ” , ” पांडव ” आणि “कौरव ” कोण ? विचारले आणि झाला गुन्हा दाखल …

हैदराबाद : द्रौपदी मुर्मू या एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत. त्यांचे नाव ऐकताच प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर काही टिप्पण्णी केली आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तेलंगणाचे भाजप नेते गुडूर नारायण रेड्डी यांच्या तक्रारीवरून रामगोपाल वर्मा यांच्या विरुद्ध हैद्राबादच्य आबिद रोड पोलीस ठाण्यात एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम गोपाल वर्मा यांनी २२ जून रोजी ट्विट करून प्रश्न विचारला होता की,
“जर द्रौपदी राष्ट्रपती असतील तर पांडव कोण आहेत? आणि महत्त्वाचे म्हणजे कौरव कोण आहेत?”
मात्र, यावर खुलासा करताना त्यांनी पुन्हा रिट्विट केले कि , हे फक्त आपण विडंबनात्मकपणे सांगितले आहे आणि इतर कोणत्याही प्रकारचा हेतू त्यामागे नाही. महाभारतातील द्रौपदी हे माझे आवडते पात्र आहे परंतु हे नाव दुर्मिळ असल्याने मला फक्त त्यांच्याशी संबंधित पात्रांची आठवण झाली आणि म्हणूनच मी व्यक्त झालो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. ”
https://twitter.com/RGVzoomin/status/1540259536493113345
दरम्यान या ट्विटमुळे एससी आणि एसटी लोकांचा अपमान झाल्याने मी पोलिसांना एससी/एसटी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याची विनंती केली आहे आणि या सिने दिग्दर्शकाला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. राम गोपाल वर्मा यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करून भाजप नेते म्हणाले, “या प्रकरणात पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की ते वर्मा यांच्यावर कठोर कारवाई करतील आणि त्यानंतर ते पुन्हा कधीही असे ट्विट किंवा कोणावरही आक्षेपार्ह विधानेकरणार नाहीत, भाजपच्या या नेत्याने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीसह पुरावे म्हणून त्यांच्या ट्विटची प्रत सादर केली आहे.
दरम्यान, गोशामहलचे भाजप आमदार टी राजा सिंह यांनीही राम गोपाल वर्मा यांच्या एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराविरुद्ध केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला, असे म्हटले आहे की, बॉलिवूड चे दिग्दर्शक अशा प्रकारचे ट्विट “नशेच्या अवस्थेत” करतात. त्याचवेळी ते म्हणाले की, वर्मा नेहमीच अशी वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे राम गोपाल वर्मा सोशल मीडियावरील वादाचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
The TREMENDOUSNESS of this INCREDIBLE icon the EXTREMELY honourable DRAUPADI being PRESIDENT is that both PANDAVAS and KAURAVAS will forget their BATTLE and TOGETHER worship her and then MAHABHARAT will be REWRITTEN in NEW INDIA and the WORLD will be proud of INDIA ..JAI BJP 💐 pic.twitter.com/MeMzVLYNdX
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) June 25, 2022
इतके सगळे झाल्यावरही त्यांनी द्रुपदी यांच्यावर पुन्हा काही ट्विट केले असून त्यात म्हटले आहे कि , आदरणीय द्रौपदीजींवर मी केलेल्या विस्तृत संशोधनानंतर आणि त्यांच्या डोळ्यांच्या तीव्रतेतील बारकावे आणि तिचे हास्य आणि चेहऱ्यावरील आकृतिबंध या दोन्ही गोष्टींचा अभ्यास केल्यावर, त्या संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट राष्ट्रपती असतील यात मला शंका नाही. धन्यवाद भाजप.
आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , आदरणीय द्रौपदी भारताच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अतुलनीय प्रतिमेचा जबरदस्तपणा म्हणजे पांडव आणि कौरव दोघेही आपापली लढाई विसरून एकत्र येऊन त्यांची पूजा करतील आणि मग भारतात पुन्हा महाभारत नव्याने लिहिलं जाईल ज्याचा संपूर्ण जगात गौरव होईल. जय भाजप !!
Post the extensive research I did on the honourable Draupadi ji and studying the nuances in the intensity of her eyes and the depths of both her smile and facial contours ,I have no doubt that she will be the GREATEST PRESIDENT EVER in the WHOLE WIDE WORLD..Thank u BJP 💐💐💐 pic.twitter.com/ykXmX1XShq
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) June 25, 2022
https://twitter.com/RGVzoomin/status/1540735374179586048
https://twitter.com/RGVzoomin/status/1540734360961576960