AurangabadCrimeUpdate : खून प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यात जिन्सी पोलिसांना यश

औरंगाबाद – दोन दिवसांपूर्वी पहूर पोलीस ठाण्याच्या हददीतून वृद्धेचा खून करून पळून गेलेला खुनी जिन्सी पोलिसांच्या खबऱ्या कडेच दागिने विक्री करण्यासाठी आला आणि पोलिसांनी काल मित्रांच्या मदतीने तो पहूर पोलिसांच्या हवाली केला. सचिन उर्फ बबलू सांडू (३०) रा. भारुडखेडा जळगाव असे अटक खून्याचे नाव आहे, तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे .
पहूर पोलिसठाण्याच्या हदीत गोद्री नावाचे गाव आहे . आरोपी सचिन हा त्या गावचा जावई आहे. २२जून रोजी दुपारी तो सहज सासुरवाडीला फेरफटका मारावा म्हणून आला होता, त्याच वेळेस एक वृध्द् महिला अंगावर दागिने घालून घरात बसलेली पाहिली घरात कोणी नसल्याचे पाहून बबलु ने गेला आवळून अंगावरचे दागिने घालून पोबारा केला .संध्याकाळ झाली तरी आजीचा खोलीतून आवाज येईना म्हणून घरच्यांनी खोलीत पाहिले तर आजी मरण पावली होती, दरम्यान पहूर पोलिसांनी आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करत तपास सुरु केला पहूर पोलीस ठाण्याचे एपीआय संजय बनसोडे यांनी हा गुन्हा त्यांचे मित्र जिन्सी पोलीस ठाण्याचे पीएसआय अनंता तांगडे यांच्या कानावर घातला होता .
काल दुपारी आरोपी सचिन हा तोंडापूर गावात दागिने घेऊन तांगडे यांच्या खबऱ्या कडे आला. पीएसआय तांगडे यांनी चोरट्याचे व दागिन्याचे फोटो खबऱ्या कडून व्हॉटसएपवर मागवले व पहूर पोलीस ठाण्याचे एपीआय बनसोडे यांना पाठवले . बनसोडे यांनी व्हॉटस ऐप वरील फोटो पाहताच त्यांना खुनाचा उलगडा झाला त्याला अटक केली जळगाव पोलिसांनीही जिनसी पोलीस ठाण्याचे पीएसआय तांगडे यांचे कौतुक केले