MarathawadaNewsUpdate : चहा प्यायला गेलेले दोन मित्र अपघातात ठार…

औरंगाबाद : चहा पिण्यासाठी दुचाकीवर जाणाऱ्या दोन जिवलग मित्रांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान खुलताबाद जवळील कागजीपुरा येथे घडली. जयेश निरंजन घोरपडे वय-२२ (रा.पहाडसिंगपुरा औरंगाबाद), मधुर बाळासाहेब भडंगे वय २३ (रा.धन्वंतरी नगर,सातारा परिसर,औरंगाबाद) अशी मृत मित्रांची नावे आहेत.
तीन शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू
नांदेड : जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पाळज शिवारात मंगळवारी सायंकाळी वीज पडून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. मृत शेतकरी शेतात पेरणीची तयारी करत होते. साईनाथ सातमवार (वय ३०), राजेश्वर चटलावार (४०) व बोजना रामनवार (३२), अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेनंतर उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र खंदारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले.
घराच्या छतावर खेळणाऱ्या मुलाचा वीज पडून मृत्यू
गडचिरोली जिल्हयात पावसाने हजेरी लावली असून काही भागात वादळी वारा व वीजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. घराच्या स्लॅब वर खेळत असताना वीज पडून १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी साडे तीन वाजताच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहरात घडली. हिमांशु गजेंद्र कुथे असे मृत मुलाचे नाव आहे.