EknathShindeNewsUpdate : Late Night : गुजरात पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार मध्यरात्री असांकडे रवाना …

सूरत : गुजरातच्या सुरत मधून तीन आमदार निसटून गेल्याने अधिक रिस्क नको म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे ३३ आणि अपक्ष ७ असे ४० आमदार गुजरात पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात स्वतंत्र विमानांनी मुंबईपासून दूर २७ हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या आसामच्या गुवाहाटी कडे रवाना झाले. मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास एएनआय या वृत्त संस्थेने हे वृत्त दिले असून त्याचा व्हिडिओही ट्विट केला आहे.
ली मेरिडियन हॉटेलहून काल मध्य रात्री सुमारे सव्वा दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास सुरतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी घेरले तेंव्हा त्यांनी , जय महाराष्ट्र, बाळासाहेबांचा ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ हा नारा सार्थ केला जाईल, फिर मिलेंगे अशी पहिली प्रतिक्रिया दिली.
ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच बागी आमदार थांबले होते त्या हॉटेलमधील गेस्टच्या यादीवरून झी २४ तासने ३३ आमदारांच्या नावांची यादी दिली असून त्यात पुढील नावांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
1 महेंद्र थोरवे
2 भरत गोगावले
3 महेंद्र दळवी
4 अनिल बाबर
5 महेश शिंदे
6 शहाजी पाटील
7 शंभूराज देसाई
8 बालाजी कल्याणकर
9 ज्ञानराजे चौघुले
10 रमेश बोरणारे
11 तानाजी सावंत
12 संदिपान भुमरे
13 अब्दुल सत्तार
14 नितीन देशमुख
15 प्रकाश सुर्वे
16 किशोर पाटील
17 सुहास कांदे
18 संजय शिरसाट
19 प्रदीप जयस्वाल
20 संजय रायुलकर
21 संजय गायकवाड
22 एकनाथ शिंदे
23 विश्वनाथ भोईर
24 राजकुमार पटेल
25 शांताराम मोरे
26 श्रीनिवास वनगा
27 प्रताप सरनाईक
28 प्रकाश अबिटकर
29 चिमणराव पाटील
30 नरेंद्र बोंडेकर
31 लता सोनावणे
32 यामिनी जाधव
33 बालाजी किनीकर
याशिवाय माध्यमांना मिळालेल्या व्हिडीओ आणि छायाचित्रातून अपक्ष आमदार बच्चू कडू आणि इतर अपक्ष आमदार दिसत आहेत. त्यांची संख्या ७ असल्याचे एएनआयने म्हटले आहे. तर टाईम्स ऑफ इंडियाने आमदारांची संख्या ३७ असल्याचे म्हटले आहे.
Maharashtra political crisis: Eknath Shinde with 33 Sena MLAs, 7 Independents leave Gujarat for Assam
Read @ANI Story | https://t.co/ysKOESptYc#MaharashtraPoliticalCrisis #EknathShinde #ShivsenaMLA #MahaVikasAghadi pic.twitter.com/pVqaTVVt3J
— ANI Digital (@ani_digital) June 21, 2022
यावेळी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना आमदारांनी बंड केलेले नाही आणि कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. बाळासाहेब आणि हिंदुत्वाच्या विचारांपासून शिवसेनेचे आमदार कधीही फारकत घेणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. जय महाराष्ट्र! बाळासाहेबांचा ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ हा नारा सार्थ केला जाईल. हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आम्ही कधी राजकीय फायद्यासाठी वापर करणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
We have not left Balasaheb Thackeray's Shiv Sena & will not leave it. We have been following Balasaheb's Hindutva & will carry it further, said Shiv Sena leader Eknath Shinde at Surat airport in Gujarat pic.twitter.com/SVnGziEGxO
— ANI (@ANI) June 21, 2022
आम्ही सर्व बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत
सत्तेसाठी असो वा राजकारणासाठी असो बाळासाहेबांची कडवट हिंदुत्वाची भूमिका आम्ही पुढे घेऊन जात आहोत. आम्ही सर्व बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही आणि शिवसेना सोडणारही नाही. मात्र, बाळासाहेबांचे विचार आणि भूमिका आम्ही पुढे घेऊन जात आहोत. बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्वाचा विचार दिला आहे. त्याच्याशी आम्ही तडजोड करणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
#WATCH | Gujarat: Shiv Sena leader Eknath Shinde, with 34 party MLAs & 7 independent MLAs, who were staying at Le Meridien hotel in Surat reach Surat International Airport to leave for Guwahati, Assam. pic.twitter.com/YtWVJEo88n
— ANI (@ANI) June 21, 2022