CongressNewsUpdate : कमलनाथ यांच्यावर महाराष्ट्राच्या निरीक्षक पदाची जबाबदारी

मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सेफ उमेदवाराचा झालेला पराभव , काँग्रेसची फुटलेली तीन मते आणि राज्यातील ताज्या राजकीय घडामोडी पाहता काँग्रेसही आपल्या आमदारांना सांभाळण्यासाठी सक्रिय झाली आहे. या प्राश्वभूमीवर काँग्रेसने आपले ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना राज्याचे निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची महाराष्ट्रासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. कमलनाथ आज रात्री किंवा बुधवारी मुंबईत पोहोचू शकतात . दरम्यान पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील हे मंगळवारी संध्याकाळीच मुंबईत पोहोचले असून त्यांनी काँग्रेसच्या आमदारांची गिनती करून घेतली आहे.
मंगळवारी रात्री माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले कि , आमचे सर्व ४४ आमदार काँग्रेसच्या सोबत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमचे उमेदवार पराभूत झाले , ते का झाले आणि आमच्या तीन आमदारांची मते कशी फुटली ? याचे परीक्षण आम्ही करीत आहोत. पक्षाच्या हिताच्या दृष्टीने हि चांगली गोष्ट नाही. सर्व आमदार पक्षासोबत आहेत आणि सर्व संपर्कात आहेत. सध्याचे संकट शिवसेनेशी संबंधित आहे. आणि शिवसेनेचे नेतृत्व या संकटाचा सामना करेल अशी आशा आहे.”