Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SangaliNewsUpdate : हृदयद्रावक : एकाच कुटुंबातील दोन भवांसह ९ जणांची आत्महत्या…

Advertisements
Advertisements
Spread the love

मिरज : सांगली जिल्ह्यात मिरज पासून जवळच असणाऱ्या अंबिका नगरमध्ये  एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष प्राशण करून  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.


मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

Advertisements

पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मिरजेमधील म्हैसाळ येथे रविवारी रात्री एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष पिऊन जीवन संपवले. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन भावांनी आपल्या कुटुंबासहित आत्महत्या केली. मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. सोमवारी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली.

Advertisements
Advertisements

माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे दोघे वेगवेगळ्या घऱात राहत होते. दोघांनी आपल्या कुटुंबासह एकाच वेळी आत्महत्या केली. एका ठिकाणी सहा जणांचे तर दुसऱ्या ठिकाणी तिघांचे मृतदेह आढळले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

मृतांमध्ये माणिक येलाप्पा वनमोरे (डॉक्टर), आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनमोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!