Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : विधान परिषदेच्या १० जागांसाठी उद्या मतदान , कोण किती पाण्यात ?

Spread the love

मुंबई : राज्याच्या विधान परिषदेची निवडणूक उद्या होत आहे . या निवडणुकीत 10 जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपचे मिळून 11 उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे राज्यसभा निवडणुकीप्रमाणे  विधान परीषद निवडणूकही बिनविरोध न होता अटीतटीच्या लढतीने होत असून आपले उमेदवार खात्रीपूर्वक निवडून यावेत , कुठलाही दगा  फटका होऊ नये म्हणून प्रत्येक पक्ष काळजी घेत आहे. त्यामुळे कोण किती पाण्यात आहे हे निकालानंतरच लक्षात येईल. सत्ताधारी आणि विरोधी भाजपची दारोमदार अपक्षांवरच अवलंबून आहे हे मात्र खरे आहे.


दरम्यान आपापले आमदार फुटू नयेत म्हणून प्रत्येक पक्षाने काळजी  सत्ताधारी महाविकास आघीडीसोबतच  विरोधी पक्ष भाजपनेही त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवले आहे. महाविकास आघाडीतील पक्षीय संख्याबळ पाहीलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येतील एवढे संख्याबळ या दोन्ही पक्षांकडे आहे तर  काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो  मात्र दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. त्यासाठी त्यांना पहिल्या पसंतीच्या 10 मतांची गरज आहे. काँग्रेसला ही अतीरिक्त मतं पुरवण्यासाठी आवश्यक असलेली मतं शिवसेनेकडे आहेत. शिवसेनेकडे लहान पक्षांचे आणि अपक्ष आमदारांची मिळून 10 अतिरीक्त मते आहेत. शिवसेनेच्या अतिरीक्त मतांवरच काँग्रेसच्या दूसऱ्या उमेदवाराचा विजय अवलंबून आहे.

या निवडणुकीत  भाजपचे 4 उमेदवार सहज निवडून येतील एवढं संख्याबळ भाजपकडे आहे. मात्र भाजपचा पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला प्रयत्न करावे लागणार आहे. त्यातही भाजपकडे लहान पक्ष आणि अपक्षांची अशी 8 अतिरिक्त मतं आहेत. भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी 7 मतं कमी पडत आहेत. त्यासाठी भाजपला महाविकास आघाडीची आणखी 7 मते मिळवावी लागणार आहेत.

असे आहेत उमेदवार आणि आमदारांची संख्या …

भाजप कडून १. प्रविण दरेकर, २. श्रीकांत भारतीय, ३. राम शिंदे, ४. उमा खापरे, ५. प्रसाद लाड हे उमेदवार रिंगणात असून भाजपकडे  106 + लहान पक्ष आणि अपक्ष आमदार 8 + राज्यसभा निवडणुकीत फोडलेले आमदार 9 = 123 असे आमदार असले तरी त्यांना आपला पाचवा उमेदवार विजयी करण्यासाठी  आणखी 7 मतांची गरज आहे.

शिवसेनेकडून १. सचिन अहिर २. आमशा पाडवी हे उमेदवार असून शिवसेनेकडे  55 + लहान पक्ष आणि अपक्ष आमदार 10 मिळून एकूण  65 आमदार आहेत . राष्ट्रवादी काँग्रेस कडून १. रामराजे नाईक निंबाळकर, २. एकनाथ खडसे हे उमेदवार असून राष्ट्रवादीकडे 51 + अपक्ष 3 असे 54 आमदार आहेत . तर काँग्रेसकडून १. चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून काँग्रेसकडे  44 आमदार असून त्यांना दुसरा उमेदवार जिंकून आणन्यासाठी 10 मतांची आवश्यकता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!