AurangabadCrimeUpdate : नशेच्या गोळ्या विकणा-या तिघांना अटक

दुचाकीसह पोलिसांनी जप्त केला ३ लाख ३७ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल
औरंगाबाद : नशेच्या गोळ्यांचा साठा करून विक्री करणा-या मेडिकल दुकानचालकासह तिघांना अंमली पदार्थ विरोधी विशेष पथक आणि अन्न व औषधी प्रशासन विभाग यांनी संयुक्त कारवाई करीत गजाआड केले. तिघांच्या ताब्यातून पोलिसांनी एक दुचाकी, नशेच्या गोळ्यांचा साठा, मोबाईल, रोख रक्कम असा एवूâण ३ लाख ३७ हजार ६९ रूपये विंâमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे प्रभारी निरीक्षक गौतम पातारे यांनी शनिवारी (दि.१८) कळविली आहे.
तारासिंग जगदिशसिंग टाक (वय २०,रा.अलाना कंपनी जवळ, गेवराई तांडा,ता.औरंगाबाद), शिवप्रसाद सुरेश चनघटे, महेश उणवने (दोघे रा.औरंगाबाद) अशी नशेच्या गोळ्यांचा साठा करून विक्री करणा-यांची नावे आहेत. तारासिंग टाक हा लांजी रोडवरील शिव मेडिकल येथून नशेच्या गोळ्या खरेदी करून विक्री करीत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला मिळाली होती. अन्न व औषधी प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक बळीराम मरेवाड, अंजली मिटकर, गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे, प्रभारी पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक मोहसीन सय्यद, सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे, पोलिस अंमलदार सय्यद शकील, प्रकाश गायकवाड, आनंद वाहुळ, दत्ता दुभाळकर, महिला पोलिस अंमलदार प्राजक्ता वाघमारे आदींच्या पथकाने शुक्रवारी रात्री सापळा रचून तारासिंग टाक याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान, तारासिंग टाक याने नशेच्या गोळ्या शिव मेडिकल स्टोअर्सचे सुरेश चनघटे यांच्याकडून खरेदी केल्या असल्याचे सांगीतले. तर चनघटे यांनी नशेच्या गोळ्या महेश उनवणे याच्याकडून घेतले असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांच्या ताब्यातून २ हजार ४८ नशेच्या गोळ्या, एक दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम असा एवूâण ३ लाख ३७ हजार ६९ रूपये विंâमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषधी निरीक्षक अंजली मिटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरूध्द वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.