Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AgnipathNewsUpdate : अॅडमिरल आर हरी कुमार म्हणतात तरुणांना योजना नीट समजली नाही …

Spread the love

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेचे नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी समर्थन केले आहे. या योजनेला देशभरातील तरुणांकडून होणार विरोध पाहताना , नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार म्हणाले की, अग्निपथ योजनेच्या विरोधात असा निषेध अपेक्षित नव्हता. विशेष म्हणजे या योजनेला त्यांनी भारतीय लष्करातील मानव संसाधन व्यवस्थापनातील सर्वात मोठे परिवर्तन म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अॅडमिरल कुमार म्हणाले की, त्यांनी अग्निपथ योजनेसाठी सुमारे दीड वर्ष काम केले आहे.


एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अॅडमिरल आर हरी कुमार म्हणाले कि , “मी स्वतः या योजनेच्या नियोजन संघाचा एक भाग होतो आणि सुमारे दीड वर्ष या योजनेवर आम्ही काम केले आहे. ही एक परिवर्तनाची योजना आहे आणि सशस्त्र दलांमध्ये अनेक प्रकारे बदल घडवून आणेल.” ते पुढे म्हणाले कि , “ही योजना देशासाठी आणि तरुणांसाठी फायदेशीर आहे कारण या योजनेमुळे अनेक संधी निर्माण निर्माण होतात. मला वाटते की या योजनेबद्दलची चुकीची माहिती आणि गैरसमजामुळे ही निदर्शने होत आहेत. जेथे पूर्वी केवळ एका व्यक्तीला सैन्यदलात सेवा करण्याची संधी मिळायची, आता ती चार जणांना मिळेल. कमी कालावधीतील सेवेबाबत आपले मत मांडताना ते म्हणाले की, याचे अनेक फायदे आहेत. अग्निवीरांना सशस्त्र सेवा करिअर म्हणून करायची की दुसरी नोकरी करायची हे ठरवण्याची संधी या योजनेमुळे तरुणांना मिळणार आहे.

विशेष म्हणजे ‘अग्निपथ’ या लष्करातील भरतीच्या नव्या योजनेला देशभरातून विरोध होत आहे. शुक्रवारी देशातील १४ राज्यांमध्ये निदर्शने होत आहेत. बिहार आणि नंतर उत्तर प्रदेशातून पसरलेली आग देशातील अनेक राज्यांमध्ये पोहोचली आहे. तेलंगणामध्ये शुक्रवारी हिंसाचाराला हिंसक वळण लागले असून, निदर्शनात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरील निदर्शनालाही  हिंसक वळण लागून तेथेही मोठी जाळपोळ झाली, त्यानंतर पोलिसांना गर्दी हटवण्यासाठी केलेल्या हवाई गोळीबारात एकाचा जीव गेला तर १५ हून अधिक जण जखमी झाले. अग्निपथ योजनेला विरोध केल्याने ३४० हून अधिक गाड्या प्रभावित झाल्या आहेत तर अनेक राज्यांमध्ये गाड्या जाळण्यात आल्या. भाजपच्या कार्यालयालाही आंदोलकांनी आगी लावून दिल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!