AurangabadCrimeUpdate : कानाला हिसका देत झुंबर पळवले, दोन तासात दोघे गजाआड

औरंगाबाद सिगारेट खरेदी करण्याचा बहाणा करत किराणा दुकानातील महिला व्यापाऱ्या चे कानातील झुमके पळवणाऱ्या दोन भामटयांना दोन तासात पोलिसांनी मुद्देमालासहित अटक केली.
वरील कारवाई मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाचे पीएसआय बाळासाहेब आहेर व गुन्हेशाखेचे पीएसआय अमोल म्हस्के यांनी पार पाडली सुंदरलाल बाबुराव राठोड (३७) व सतीश संजय पवार (२१) दोघेही रा. अंबिकानगर असे अटक आरोपीचे नाव आहे रामनगरातील ईलग यांच्या किराणा दुकानात काल संध्याकाळी(१५/०६) सहा वा. ही घटना घडली वरील दोन्ही आरोपी हे सिगारेट घेण्याच्या बहाण्याने ईलग यांच्या किराणा दुकानात गेले. त्यावेळी इंद्रायणी ईलग (५०) या दुकानात ग्राहक हाताळत होत्या त्याच वेळेस वरील दोन्ही मजुरांनी चोरी केली.
पोलीस निरीक्ष ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कारवाई पार पडली. यावेळी पोलीस कर्मचारी नर्सिंग पवार, बाबासाहेब कांबळे, सुखदेव जाधव मनोहर गीते, संतोष भानुसे यांनी सहभाग नोंदवला