Aurangabad Crime Update : पोलीस निरीक्षक मिसाळ फरार

औरंगाबाद – लाच प्रकरणात दाखल झाल्या नंतर तत्कालीन महिला पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ या फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी दिली आहे.
१९ मी रोजी सुटीवर निघालेल्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी गुटखा वाहतुकी साठी व्यापाऱ्याकडून १२ हजार रु. लाच स्वीकारण्यासाठी पोलीस कर्मचारी रणजित शिरसाठ याला पिटाळले पण फिर्यादीने एसीबी कडून सापळा रचलेला होताच शिरसाठ अलगद एसीबी च्या ताब्यात आला १० हजार रु पोलीस निरीक्षक मिसाळ यांच्यासाठी व दोन हजार रु स्वतासाठी अशी मागणी होती. ही कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांनी पार पाडली होती.
अटक आरोपी शिरसाठ ने पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्या सांगण्यावरून लाच मागितल्याचा जबाब एसीबीला दिला. शिरसाठ च्या जबाबाची शहानिशा झाल्यावर सुनीता मिसाळ यांना अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक खाडे यांनी दिले. दरम्यान मिसाळ यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली पण कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर एसीबीने सुनीता मिसाळ फरार झाल्याचे घोषित केले.