AurangabadCrimeUpdate : सावधान !! सेवानिवृत्त वृद्धाला ३४ लाखाचा घातला गंडा …

औरंगाबाद : कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या नावाने बजाज कंपनीतून निवृत्त झालेल्या वृद्धाला भामट्याने दीडवर्षांपूर्वी ३४ लाख रु चा गंडा घातल्याचा गुन्हा हर्सूल पोलीस ठाण्यात १४ जून रोजी दाखल झाला आहे.
सुधाकर मारोती खंडागळे (५८) रा. सिद्धेश्वर नगर जाधववाडी हर्सूल असे फिर्यादीचे नाव आहे. ते जून २०२२ मध्ये निवृत्त झाले असून त्यांना जानेवारी २०२१ मध्ये व्हॉटसएपवर कौन बनेगा करोडपती या नावाने मेसेज आला की, तुम्हाला ३३ लाख आणि ५१ लाख असे दोन लकी ड्रॉ लागले आहेत. व त्यासाठी खाली दिल्या क्रमांकावर फोन करण्यास सांगितले.
खंडागळे यांनी भामट्याने दिलेल्या नंबरवर फोन केले असता त्यांना १ लाख ७० भरा से रु. भरा असे सांगितले तसेच तुम्हाला एकूण १ कोटी १५ लाख रु. एवढी रक्कम बक्षेसापोटी मिळणार असे सांगून भामट्यानी दिलेल्या बॅंक ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या खात्यावर ३४ लाख सहा हजार ४९७ र, भरावयास लावले पण कोणतेही बक्षिसाची रक्कम त्यांना आज पर्यंत मिळाली नाही . हा घटनाक्रम हर्सूल पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी खंडागळे यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल देवकर करत आहेत