MumbaiNewsUpdate : अरे रे हे काय ? आदित्य ठाकरे यांना अडवल्याने पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेवर मुख्यमंत्रीही संतापले ….!!

मुंबई : देहू येथील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून संताप व्यक्त केला जात असतानाच प्रोटोकॉल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी निघालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गाडी अडवत आयएनएस शिक्रा येथे सुरक्षा गार्डसनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न केल्याने मुख्यमंत्री संतप्त झाल्याचे वृत्त आहे .आदित्य ठाकरे हे राजशिष्ठाचार मंत्री असल्याने ते मुख्यमंत्र्यासोबत नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्यासाठी निघाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील देहू येथील कार्यक्रमानंतर मुंबईत विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: हजर राहिले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयएनएस शिक्रा येथे स्वागत केले. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांसोंबत राज्याचे राज शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे देखील निघाले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेकडून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न झाला. यावेळी उद्धव ठाकरे या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेवर चांगलेच संतापल्याचे वृत्त आहे.
विशेष म्हणजे या आधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात राजशिष्टाचार मंत्री म्हणून आदित्य ठाकरे उपस्थित राहिलेले आहेत. यावेळी मुख्यमंत्री सोबत असताना पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेकडून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न झाला.