IndiaPoliticalUpdate : जशा दर वर्षी २ कोटी नोकऱ्या दिल्या , तशाच आता १० लाख नोकऱ्या , हि तर महा जुमल्याची सरकार : राहुल गांधी

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या अवंतीने पुढच्या दीड वर्षात 10 लाख नोकऱ्या देण्यात येत करताच पंतप्रधान मोदींच्या तवीचा काँग्रेस नेते राहुल यांनी खिल्ली उडवली. यावर आपली प्रतिक्रिया देताना आपल्या ट्विटमध्ये राहुल यांनी म्हटले आहे की, “८ वर्षांपूर्वी जसे तरुणांना दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याविषयी ठोकून दिले होते, त्याचप्रमाणे आता १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याची पाळी आहे. हि “जुमल्या”ची नाही तर “महाजुमल्या”ची सरकार आहे. पंतप्रधान नोकऱ्या तयार करण्यात नव्हे तर बातम्या तयार करण्यात एक्सपर्ट आहेत.
जैसे 8 साल पहले युवाओं को हर साल 2 करोड़ नौकरियों का झांसा दिया था, वैसे ही अब 10 लाख सरकारी नौकरियों की बारी है।
ये जुमलों की नहीं, 'महा जुमलों' की सरकार है।
प्रधानमंत्री जी नौकरियां बनाने में नहीं, नौकरियों पर 'News' बनाने में एक्सपर्ट हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 14, 2022
राहुल यांनी यापूर्वी चीनचा मुद्दा, कोरोनाला तोंड देण्यात केंद्र सरकारचे अपयश, महागाई आणि पेट्रोल-डिझेलचे दर या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर चीनप्रकरणी देशाला अंधारात ठेवल्याचा आरोप केला होता.
भारताच्या सीमेजवळ चीनकडून विकसित करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांबाबत अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “चीन भविष्यातील शत्रुत्वाच्या कारवायांसाठी पाया घालत असून भारत सरकारचा विश्वासघात करत आहे.”
दरम्यान नॅशनल हेराल्ड प्रकरणात कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राहुल आणि त्यांची आई सोनिया गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांची सोमवारी आणि आज मंगळवारी चौकशी करण्यात आली असून काँग्रेसकडून या कारवाईच्या विरोधात आंदोलन केले जात आहे.