IndiaNewsUpdate : धक्कादायक : मर्सडिज कारमध्ये सामूहिक बलात्कार , पबमध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलांचे कृत्य

हैदराबाद : हैदराबादमधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या भागात एका मर्सडिज कारमध्ये करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून पाच आरोपींची ओळख पटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शहरातील पॉश भागात कारमध्ये 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार होण्याच्या काही तासांपूर्वी पबमधून बाहेर पडलेल्या संशयितांचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून ज्यामध्ये पीडिता मुलांसोबत पबमधून बाहेर पडताना दिसत आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार या मुलांनी कथितपणे कार ज्युबली हिल्स परिसरात उभी केली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, तर बाकीचे कारच्या बाहेर पहारेकरी उभे होते. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हे इयत्ता 11वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत. पीडितेने त्या मुलासोबत पब सोडला होता, ज्याने तिला घरी सोडण्याची ऑफर दिली होती. फुटेजमध्ये मुलगी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत मुलांसोबत जाताना दिसत आहे. ते पबच्या बाहेर उभे राहून दिवसा फिरताना दिसतात. व्हिडिओमध्ये दिसत आहे की मुलगी मित्राला मिठी मारते, निरोप घेते आणि मुलांसोबत कारमध्ये चढते. काही वेळानंतर, मुलांनी कथितपणे कार ज्युबली हिल्समध्ये पार्क केली आणि तिच्यावर बलात्कार केला तर इतर कारच्या बाहेर पहारा देत होते.
अल्पवयीन विद्यार्थी पबमध्ये गेले कसे ?
या क्लबने अल्पवयीन मुलांना प्रवेश कसा दिला आणि त्यांच्याकडे दारू आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. त्याच वेळी, पबच्या व्यवस्थापकाने स्पष्ट केले आहे की पार्टीमध्ये कोणालाही मद्यपान किंवा धूम्रपान करण्यास परवानगी नाही. ईशान नावाच्या व्यक्तीने पार्टीसाठी जागा बुक केली होती. पार्टीनंतर सर्वजण गाडीत बसून निघाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे इयत्ता 11वी आणि 12वीचे विद्यार्थी असून ते ‘राजकीयदृष्ट्या प्रभावशाली’ कुटुंबातील आहेत. यामध्ये एका आमदाराचा मुलगा देखील या गटाचा भाग असल्याचे दिसत असले तरी परंतु पोलिसांचे म्हणणे आहे की तो सामूहिक बलात्कारात सहभागी नसावा. गेल्या शनिवारी संध्याकाळी ही तरुणी तिच्या मित्रासोबत पबमध्ये गेली होती, ती लवकर निघून गेली. हा संपूर्ण ग्रुप त्या आधी पेस्ट्रीच्या दुकानातही गेला होता. मात्र यावेळी जेंव्हा मारामारी झाली तेंव्हा आमदाराचा मुलगा गाडीतून उतरून पळून गेला होता.
मुलीच्या जबाबानंतर दाखल झाला गुन्हा
जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या मानेवर झालेल्या जखमा पाहिल्या आणि तिला विचारले तेव्हा तिने सांगितले की, पबमध्ये एका पार्टीत गेल्यानंतर काही मुलांनी तिच्यावर हल्ला केला होता. त्यानुसार मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. परंतु मुलीने सविस्तर जबाबाच्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रारंभी नेमके काय झाले ? हे सांगण्याच्या मनस्थितीत मुलगी नसल्याने वडिलांनाही काय झाले याची पूर्ण खात्री नव्हती. दरम्यान या मुलीला महिला अधिकाऱ्यांकडे पाठवले असता घडलेला प्रकार उघड झाला मात्र मुलगी आरोपीची ओळख सांगू शकली नाही. फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.
पबच्या मॅनेजरने सांगितले की, “इशान नावाच्या व्यक्तीने 150 लोकांसाठी पार्टीसाठी जागा बुक केली होती, पण नंतर आणखी 30 जण जोडले गेले. पार्टीनंतर ते सर्वजण कारमध्ये एकत्र गेले आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी बाहेर दारू घेऊन ते पबमध्ये पीत होते.”