AurangabadCrimeUpdate : ठेकेदाराचा खून करण्याचा प्रयत्न,आरोपी अटक

औरंगाबाद – पडेगावात सकाळी १०.३० एका इसमाने ठेकेदाराला कामावरुन कमी केल्याचा राग मनात ठेवून चाकू हल्ला करंत गंभीर जखमी केले. व गळ्यातील साडेतीन तोळ्याची चैन लंपास केली.या प्रकरणी छावणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
रितेश मेहरा असे अटक आरोपीचे नाव आहे. हा बन्सीलालनगरातील स्वस्वप्नील चौधरी(४८) यांच्याकडे कामाला होता. पण चार महिन्यातच रितेश मेहरा ला चौधरी यांनी कामावरुन काढून टाकले.समाजातील त्याची वर्तणूक बरोबर नसल्याचे चौधरी यांना लक्षात आले होते. याचा राग मनात धरुन चौधरी यांच्यावर पाळंत ठेवून पडेगाव जवळ आज सकाळी १०.३०वा. मोटरसायकलवर जात त्यांची गाडी अडवली.कार मधे बसून त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला.
परिसरातील नागरिकांनी जखमी चौधरी यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.दरम्यान छावणी पोलिसांना ही घटना कळल्यावर एपीआय पांडुरंग भागिले यांनी आरोपी रितेश मेहरा ला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय भागिले करंत आहेत.