UPSCResult2021Update : लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर , जामिया मिलिया इस्लामियाची श्रुती शर्मा देशात सर्वप्रथम

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. श्रुती शर्मा ही युवती प्रथम आली आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर देखील मुलींनीच बाजी मारली आहे. अंकिता अग्रवाल आणि गरिमा सिंगला या महिला उमेदवारांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत एकूण ७४९ उमेदवार यशस्वी झाले आहेत.
हा सर्व निकाल यूपीएससीच्या upsc.gov.in या वेबसाईटवर पाहता येईल. दरम्यान उमेदवारांचे वैयक्तिक गुण निकालानंतर १५ दिवसांनी जाहीर करण्यात येणार आहेत. आयोगाने १७ मार्च रोजी नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ आयोजित केली होती. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती ५ एप्रिल ते २६ मे २०२२ या कालावधीत घेण्यात आल्या. या परीक्षेच्या माध्यमातून नागरी सेवेतील ७१२ पदे भरली जाणार आहेत.
जामिया कोचिंग अकादमीला यशाचे श्रेय : श्रुती शर्मा
श्रुती सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे आणि ती जामिया मिलिया इस्लामिया निवासी कोचिंग अकादमीमध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करत आहे.
UPSC CSE प्राथमिक परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी झाली आणि परीक्षेचा निकाल 29 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली आणि निकाल 17 मार्च 2022 रोजी घोषित करण्यात आला. 5 एप्रिलपासून सुरू झालेल्या आणि 26 मे रोजी संपलेल्या परीक्षेची मुलाखत ही शेवटची फेरी होती.
पायरी 2: मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या ‘UPSC नागरी सेवा अंतिम निकाल 2021’ या लिंकवर क्लिक करा.
पहिल्या १० गुणवंत असे आहेत …
१ श्रुती शर्मा
2 अंकिता अग्रवाल
3 गामिनी सिंगला
4 ऐश्वर्या वर्मा
5 उत्कर्ष द्विवेदी
6 यक्ष चौधरी
7 सम्यक एस जैन
8 इशिता राठी
9 प्रीतम कुमार
10 हरकीरत सिंग रंधावा
2020 मध्ये, एकूण 761 उमेदवारांनी UPSC CSE अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली, त्यापैकी 545 पुरुष आणि 216 महिला होत्या. या परीक्षेत शुभम कुमार हा पहिला तर जागृति अवस्थी दुसरी आणि अंकिता जैन तिसऱ्या स्थानावर होत्या.