AurangabadCrimeUpdate : दोन लाखांच्या दागिन्यांसह गुन्हे शाखेकडून दोन महिलांना अटक

औरंगाबाद – शहरातील कमांड कंट्रोल चे २२४ व खासगी ७५सी.सी. टिव्हींचे फुटेज तपासून नामांकित ज्वेलर्स मधून सोने लंपास करणार्या दोन महिलांना गुन्हेशाखेने दोन लाखांच्या मुद्देमालासहित अटक केले.
या महिलांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वरील महिलांनी चोर्या केल्याचे तपासात उघंड झाले. रिलायन्स ज्वेलर्स, वामनहरी पेठे ज्वेलर्स, सावंत ज्वेलर्स या ठिकाणाहून चोर्या केल्यानंतर त्या शहरात सी.सी. टि.व्ही. नसल्याची खात्री करुन कपडे बदलत होत्या. नेमका हाच घटनाक्रम एपीआय मनोज शिंदे आणि त्यांच्या पथकाने तपासत आरोपी महिलांना जेरबंद केले. त्यांच्या राहत्या घरातून गुन्हा करतांना वापरलेले कपडे व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान आरोपी महिलांनी चोरलेले दागिने किराडपुर्यातील हसमुख चव्हाण हिना ज्वेलर्स यांना विक्री केले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून दागिने जप्त केले.वरील कारवाई पोलिसउपायुक्त अपर्णा गिते, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मनोज शिंदे, पोलिस उपनिरीक्षक दगडखैर, पोलिस कर्मचारी दत्ता गढेकर,संजीवनी शिंदे, प्राजक्ता वाघमारे आदींनी केली.