Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : श्रीमंत शाहू छत्रपती यांना किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून दिली : देवेंद्र फडणवीस

Spread the love

मुंबई : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा निवडणुकीसाठीच्या भूमिकेवरून आपले मत पत्रकारांशी केल्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असे म्हणत आपली प्रतिक्रिया देतांना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून दिली असे म्हटले आहे.


श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले कि , “शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत त्यामुळे त्यांनी कोणतेही मत व्यक्त केले असले तरी त्या संदर्भात मी बोलणार नाही. मला एकाच गोष्टीचे दुःख आहे की काही किडक्या डोक्याच्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट तयार करुन चुकीची माहिती दिली आहे. त्या लोकांना समजत नाही की, अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटं ठरवतं आहेत.

दुसरीकडे शाहू महाराज आणि संभाजीराजेंमध्ये काहीतरी अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं काम करणाऱ्यांबद्दल मला प्रचंड दुःख आहे,” . वास्तविक पाहता शाहू महाराजांचे वक्तव्य ऐकल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टपणे ट्विट करुन सांगितले आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो मी जे बोललो ते सत्य बोललो. मला असं वाटतं की प्रतिक्रिया बोलकी आहे.

भाजपाला संभाजी राजे यांच्यामुळे कोणतेही नुकसान नाही

दरम्यान युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे कौतुक कि , संभाजी राजे यांचे नेतृत्व गेल्या सहा वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे तयार होत होते आणि सध्या ही होत आहे. मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा नेतृत्व तयार झाल्यानंतर आणि तेही पश्चिम महाराष्ट्रात तयार झाल्यानंतर त्याचा कुठलाही नुकसान भाजपाला नाही. त्याचे नुकसान कोणाला आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून संभाजीराजे यांचे नेतृत्व तयार होऊ नये या प्रकारचे प्रयत्न कोण करणार हे ज्याला कोणाला राजकारण कळते त्याला समजू शकते,” असेही फडणवीस म्हणाले.

घराण्याची परंपरा म्हणूनच त्यांना आम्ही पदावर बसवले होते…

“आभार मानन्यापूर्वीच मला संभाजीराजे छत्रपती भेटले होते त्यापूर्वीच त्यांनी मी कुठल्याही पक्षाचे तिकिट न घेता स्वतंत्र निवडणुकीला उभा राहणार असल्याची घोषणा केली होती. माझी अपेक्षा आहे की घराण्याची परंपरा पाहता मागच्या वेळी राष्ट्रपती कोट्यातून भाजपाने आम्हाला समर्थन देऊन त्या पदावर बसवले तसेच सगळ्या पक्षांनी मिळून अपक्ष म्हणून मला समर्थन दिले पाहिजे. सगळे समर्थन देणार असतील मी जरुर हायकमांड सोबत चर्चा करेन असे आश्वासन दिले होते. काही लोक ज्या प्रकारचे राजकारण करत आहेत ते नक्कीच उघडे पडतील,” असे फडणवीस म्हणाले.

काय बोलले होते श्रीमंत शाहू महाराज ?

संभाजीराजे छत्रपती हे राजकारणात घेत असलेले सर्व निर्णय हे त्यांचे वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध नाही. तरीही ते अशाप्रकारे चुकीचा संबंध जोडत असतील तर ते चुकीचे असल्याचा निर्वाळा श्रीमंत शाहू महाराज यांनी येथे बोलताना दिला होता. तसेच शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात काही मुद्दय़ावर राज्यसभेच्या उमेदवारीबाबत ठरले होते. यातूनच ही उमेदवारी काही कारणांनी ते देऊ शकले नसतील तर त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द न पाळल्याची टीका होणेदेखील चुकीचे असल्याचे मत शाहू महाराजांनी व्यक्त केले. तसेच ज्या ड्राफ्ट बद्दल संभाजी राजे बोलत आहेत तो कच्चा ड्राफ्ट होता त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला असे म्हणणे योग्य नसल्याचेही शाहू महाराज म्हणाले होते.

सत्यच बोललो – संभाजीराजेंचा पवित्रा

दरम्यान राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडीवरून श्रीमंत शाहू महाराज यांचे विधान चर्चेत असताना संभाजीराजे छत्रपती यांनी यावर समाज माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवताना ‘ मी सत्यच बोललो आहे’ असे म्हणत आपले विधान खरे असल्याचा दावा केला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही असा आरोप केला होता. त्यावर श्रीमंत शाहू महाराज यांनी राज्यसभा निवडणूक लढवणे हा संभाजीराजेंचा व्यक्तिगत निर्णय होता. त्यात छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा मुद्दा येत नाही, अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. या वर संभाजीराजे यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!