MaharashtraPoliticalUpdate : महाराष्ट्रात सुरु आहे “एमपीएल ” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज बीकेसीत बॅटिंग …!!

मुंबई : सध्या महारष्ट्रात सर्व पक्षीय सभांचे खेळ चालू आहेत . पाडव्याला या खेळाची सुरुवात मनसे नेते राज ठाकरे यांनी शुभारंभ करीत एका पाठोपाठ एक अशा तीन सभा घेतल्या . तर भाजपने मुंबईत एक सभा घेतली त्यानंतर आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत सर्व विरोधकांना उत्तर देण्यासाठी ” हुंकार सभा” घेत आहेत. एकूण काय तर महाराष्ट्रात “महाराष्ट्र पॉलिटिकल लीग ” एमपीएल चे सामने होत आहेत . या सामान्यांनी क्रिकेटच्या “आयपीएल ” सामान्यांनाही मागे टाकले आहे.
आजच्या हुंकार सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे विरोधकांवर आक्रमकपणे बाण चालवतील असे एकूण चित्र आहे . सामन्याच्या भाषेत बोलायचे तर आज उद्धव ठाकरे मुंबईच्या होम पिचवर बॅटिंग करणार आहेत. अर्थात उद्धव ठाकरे यांच्या टीम मध्ये जसे काँग्रेस , राष्ट्रवादीचे नेते आहेत तसे भाजपच्या टीम मध्ये त्यांच्या स्वतःच्या खेळाडूंसह इतर खेळाडूही हायर करण्यात आले आहेत . म्हणून त्यांच्याकडून राणे , राणा , राज आणि इतर काही स्लीपिंग खेळाडू आहेत. मुंबईतील बीकेसी मैदानावर सायंकाळी ७ वाजता उद्धव ठाकरे आपल्या बॅटिंगला प्रारंभ करणार असून महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातही हे सामने खेळण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सामन्यासाठी महाराष्ट्रात विभागवार सभा आखण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. आपल्या या दौऱ्यात उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या सर्व विभागात जाणार असून त्या त्या भागातील शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान शिवसेनेने मुख्यमंत्री पदाच्या वादातून भाजपशी काडीमोड करीत काँग्रेस -राष्ट्रवादीच्या मदतीने आपले राज्य निर्माण केले आहे. हि गोष्ट भाजप सत्तेचा अर्ध डाव संपत आला तरी मनातून काढायला तयार नाही . या शल्यामुळे भाजप नेते शिवसेनेवर टीका करण्याची आणि शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत हे चित्र महाराष्ट्र रोज अनुभवत आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेमुळे वैतागलेले उद्धव ठाकरे आजवरचा हिशेब चुकता करतील असा अंदाज आहे.
विरोधकांना सडेतोड उत्तर देणारी सभा : खा. संजय राऊत
या सभेबद्दल भाष्य करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे कि , “ही सभा ऐतिहासिक आहे. कोविड, लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचं आजारपण यामुळे उद्धव ठाकरे अशा सभांच्या व्यासपीठावर मध्यंतरी आले नव्हते. ते आता येत आहेत. ही सभा लोकांच्या, विरोधकांच्या मनातल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देणारी असेल. ही सभा फक्त त्यासाठीच नाही. गेल्या काही दिवसांत विरोधकांनी महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्याचा, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा, महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या पायावर हल्ले चालवले आहेत. या सगळ्याबाबत उद्धव ठाकरे परखडपणे बोलतील अशी आमची अपेक्षा आहे”.