Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : मनपा प्रशासकांना जबरीने निवेदन देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यास अटक

Spread the love

औरंगाबाद :  महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांच्या अंगावर धावून जाणार्‍या एका सामाजिक कार्यकर्त्याला  सिटीचौक पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्यात अटक केली. राहूल इंगळे असे या कार्यकर्त्याचे नाव  आहे. त्याच्या सोबंत असणारा जोडीदार योगेश हरिश्र्छंद्र मगरे रा.एन२सिडको याचाही गुन्ह्यात समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरून महापालिका अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने आंदोलनही केले होते. 

या प्रकरणात माहिति देताना पोलिसांनी सांगितले कि , आज दुपारी दीड ते दोन च्या सुमारास आयुक्त आस्तिककुमार पांडे त्यांच्या कार्यालयात असतांना आरोपी राहूल इंगळे हा त्याचा साथीदार योगेश मगरे सोबंत महापालिका कार्यालयात आला. व आयुक्तांना निवेदन देण्याचा प्रयत्न करंत असतांना पांडे यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार देताच हा कार्यकर्ता  पांडे यांच्या अंगावर धावून गेला. तर या घटनेचे मोबाईल चित्रण योगेश मगरे याने केले. हा प्रकार घडल्यानंतर आयुक्त पांडे यांचा सुरक्षा रक्षक शेकनाथ तांदळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला.

दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर आपण शहरातील पाणीटंचाईबाबत २००० लोकांच्या सह्यांचे निवेदन देण्यास गेलो असता मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी निवेदन घेण्यास नकार देत तुम्ही प्रशासनही बदनामी करीत आहात असे म्हटल्याचे माध्यमांना सांगितले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सिटीचौक पोलिस करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!