AurangabadCrimeUpdate : इलाका छावणीचा , धमाका सिटीचौक पोलिसांचा ….

औरंगाबाद – छावणी पोलिस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे सिटीचौक पोलिसांनी उघडकीस आणत ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करून रेकाॅर्डवरचे दोन आरोपी अटक केले.
मो.रईस मो. हनीफ उर्फ बोक्या(३२) रा पडेगाव व फेरोजखान सुभानखान(३४)रा. भोईवाडा अशी अटक आरोपींची नावे आहेत. सिटीचौक पोलिस गस्तीवर असतांना वरील दोन चोरटे त्यांच्या हातास लागले. दोघांकडून चोरीची मोटरसायकल व ३५ हजारांचे २१ मोबाईल फोन जप्त केले. वरील कारवाई पोलिस निरीक्षक अशोक गिरी, अशोक भंडारे एपीआय मोसीन सय्यद,पोलिस कर्मचारी अभिजित गायकवाड, देशराज मोरे, माजिद पटेल यांनी पार पाडली