AurangabadCrimeUpdate : लागाचें आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण , दोन महिन्यांनंतर गुन्हा

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमीष दाखवत जागतिक महिला दिनी शोषण करणार्या मजुरावर दोन महिन्यानंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे.
संतोष यशवंत सरनागट रा. मुकुंदवाडी गाव असे आरोपीचे नाव आहे. तो गावातील जगताप वाड्यात राहतो. त्याच्याच शेजारी राहणार्या एका अल्पवयीन मुलीला त्याने लग्नाची मागणी घातली व लग्न पक्के करायचे असल्यास शारिरीक संबंध ठेवावे लागतील तर तुझी आई आपोआप लग्नाला परवानगी देईल असे सांगत तिचे शोषण गेल्या ८ मार्च , ११ मार्च व ४ एप्रिल रोजी शोषण केले.
पिडीतेच्या आईला हा प्रकार कळल्यावर तिने विश्वासात घेत मुलीकडून घडलेला प्रकार जाणून घेतला व पोलिसांकडे धाव घेताच गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय व्ही. एम. गुळवे करंत आहेत.