MaharashtraNewsUpdate : पाणी टंचाईमुळे एकाच कुटुंबातील ५ जणांचा तलावात बुडून मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रातील डोंबिवली येथे तलावात बुडून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने रात्री उशिरा सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. ही संतापजनक घटना मुंबईला लागून असलेल्या डोंबिवलीतील संदप गावातील असून, गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गावात पाणीटंचाई असल्याने कुटुंबातील सदस्य तलावात कपडे धुण्यासाठी गेले होते. महिला कपडे धुत असताना त्यांच्यासोबतचे एक मूल तलावात पडले, त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी एकामागून एक पाण्यात उडी मारली. यानंतर पाचही जण बुडाले.
मीरा गायकवाड (55), तिची सून अपेक्षा (30) आणि नातू मयुरेश (15), मोक्ष (13) आणि नीलेश (15) अशी मृतांची नावे आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एक महिला आणि तिची सून तलावाजवळ कपडे धुत होते. तिथे बसलेला एक मुलगा अचानक घसरला आणि तलावात गेला आणि तो बुडू लागला. तेथे उपस्थित असलेल्या इतर चार कुटुंबीयांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सर्वजण बुडाले.
या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत ग्रामस्थांकडून विविध अंदाज बांधले जात आहेत. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा तपास करत आहेत. यासोबतच यासंदर्भात ग्रामस्थांचीही चौकशी करण्यात आली आहे.