AurangabadCrimeUpdate : हुंड्यासाठी छळ होत असल्याची विवाहितेची तक्रार

औरंगाबाद : एक वर्षाच्या आत नवविवाहितेचा माहेरुन ५ लाख रु.आणण्यासाठी सासरचे लोक छळ करंत असल्याचा गुन्हा ५ जणांविरोधात सातारा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. दिव्या शुभम महाले(१९) रा.सुधाकरनगर असे फिर्यादीचे नाव आहे.मे २०२१ मधे तिचे लग्न शुभम महाले याच्या सोबत झाले. फिर्यादीचे सासरे अशोक महाले हे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून ग्रामिण पोलिस अधिक्षक कार्यालयात काम करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासु कडूबाई, व भाया आणि त्याची बायको असे घरातील सर्वजण मानसिक व शारिरीक छळ करंत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्याचप्रमाणे फिर्यादी ही मनोरुग्ण असल्याचे कारण देत तिच्यावर उपचारही करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.फिर्यादीचे वडील मच्छींद्र नागरे हे फोटोग्राफर म्हणून वृत्तपत्रात काम करतात.या छळाला कंटाळून फिर्यादी ही नोव्हेंबर २१ पासून माहेरी राहते. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिरसाठ करंत आहेत.