AurangabadCrimeUpdate : वृध्दाला मारहाण करणाऱ्या तरुणावर खुनी हल्ला, तिघांना अटक

औरंगाबाद – दारुच्या नशेत वृध्दाला मारणार्या इसमाला त्याच्या घरात जाऊन वृध्दाने मुलासोबंत चाकू व फायटर ने बदडले. मुकुंदवाडी पोलिसांनी जखमीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करंत तिघांना अटक केली.
राजेंद्र सिताराम नागरे(५४) ,दिपक राजेंद्र नागरे(२४) व शुभम शिरसाठ (२१) सर्व रा. जयभवानीनगर गल्ली नंबर ९ अशी अटक आरोपींची नावे आहेत.या तिघांनी आज पहाटे २ च्या सुमारास सागर वाठ्ठल थोरात(३०) याला त्याच्या घरात जाऊन चाकू व फायटरने मारले.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, सागर थोरातने काल रात्री (२६/०४) दहाच्या सुमारास दारुच्या नशेत आरोपी राजेंद्र नागरे वय ५४ यांना मारहाण केली व त्याच्या घरासमोरच झोपला. दरम्यान पहाटे दोन वा. उठून घरी गेल्यावर राजेंद्र नागरे, त्याचा मुलगा दिपक व दिपक चा मित्र शुभम यांनी राजेंद्र नागरे यांना मारहाण करणाऱ्या सागर थोरातचे हातपाय पकडून चाकूने सपासप वार केले व फायटर ने मारहाण केली. आज सकाळी ७ वा.सागर रक्तबंबाळ अवस्थेत उठल्यावर परिसरातील नागरिकांनी पिंक व्हॅन ला फोन करुन पुंडलिकनगर पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान पुंडलिकनगर पोलिसांनी मुकुंदवाडी पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत जखमी सागर थोरात ला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.व नागरे पिता पुत्रा सहित शुभम शिरसाठ ला अटक केली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सचिन मिरधे करंत आहेत.