MaharashtraPoliticalUpdate : राज ठाकरे यांना अभ्यास करण्याचा शरद पवार यांचा सल्ला …

औरंगाबाद : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर केलेली टीका काहीही झाले तरी पवार विसरण्यास तयार नाहीत असेच दिसून येत आहे. आजच्या औरंगाबाद दौऱ्यातही शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे कि , शरद पवार हे फुले शाहू आंबेडकरांचे नाव का घेतात. यासाठी महाराष्ट्राचा अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्र वाचला पाहिजे, प्रबोधनकार समजले पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांच्या उपस्थितीत मुप्टा या शिक्षक संघटनेच्या रौप्यमहोत्सवी शिक्षक अधिवेशनाच्या कार्यक्रम पार पडला, मुप्टा ही राज्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षक आणि प्राध्यापकांची मोठी संघटना आहे, मुप्टा संघटना राष्ट्रवादी कॉंग्रेसला संलग्न असल्यामुळे शरद पवारांची या कार्यक्रमाला उपस्थिती असून यासाठी अजित पवार देखील उपस्थित होते. यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना सुनावले.
शिवरायांनी जे राज्य केलं ते भोसलेंचं राज्य नव्हतं ….
यावेळी बोलताना पवार म्हणाले कि , ‘माझ्यावर टीका केली की, मी शिवाजी महाराज यांचं नाव का घेत नाही. शाहु, फुले आणि आंबेडकर यांचं नाव का घेत आहे. शिवरायांचं नाव हे तुमच्या माझ्या अंतकरणात आहे. ते आगळे वेगळे राजे होऊन गेले. कुठे मोगलाचे राज्य होते, कुतुबशाहीचे राज्य होते, अशा परिस्थितीत अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन राज्य स्थापन केले ते शिवाजी महाराजांनी केलं. अनेक राजे होऊन गेले पण तिनशे आणि चारशे वर्षांनंतरही लोकांच्या मनात त्यांचं स्थान आहे, लोकांना आजही विचारलं गेलं तर त्यांचं उत्तर फक्त शिवाजी महाराज असं येतं. शिवरायांनी जे राज्य केलं ते भोसलेंचं राज्य नव्हतं तर ते रयतेचं राज्य होतं. ते हिंदवी स्वराज होते, ज्यांनी इतिहास घडवलं त्यांचे स्थान अंतकरणार आहे, त्याचे नाव सांगायची गरज नाही, असं म्हणत पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
….म्हणून शाहू , फुले , आंबेडकरांचे महत्व
दरम्यान सर्वसामान्यांचा विकास करायचा असेल तर फुले यांचे विचार विसरून कसे चालेल, शाहू राजे हे आगळे वेगळे राजे होते. खोट्या गोष्टी त्यांना आवडत नव्हत्या. भ्रामक गोष्टु त्या धुडकावून लावायचे. आंबेडकर यांनी संविधान देशाला दिले. संविधान एवढा मजबूत आहे की आपल्या बाजूच्या देशात अशांतात आहे मात्र भारतात शांतता आहे हे संविधानाचे महात्म्य आहे, धरण बांधण्याचे विचार सर्वात आधी सांगितले. भांकरा नांगल धारण बाबासाहेबांच्या सहीने बांधले गेले, असेही पवारांनी आवर्जून सांगत राज ठाकरेंना टोला लगावला.