AurangabadCrimeUpdate : पोलीस असला म्हणून काय झाले ? दोन धर्मात तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल

औरंगाबाद : मस्जित च्या दिशेने नमाजाच्या वेळी लाऊडस्पीकरवर मोठ्याने संगीत वाजवणार्या पोलिसावरच सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. किशोर गुंडुप्पा मुलुकनाईक रा. अमृतसाई प्लाझा बिल्डींग असे या पोलिसांचे नाव आहे.
त्याचे झाले असे कि , हे महाशय परळी येथे रेल्वे पोलिस विभागात कार्यरत आहेत. २३एप्रिल रोजी संध्या. ७.३० वा.घराच्या मागिल भागात असलेल्या मशिदीच्या दिशेने नमाजच्या वेळी मोठ्याने लाऊडस्पीकर त्याने गाणे वाजविण्याचा पराक्रम केला.या प्रकरणी सातारा पोलिसांनी स्वता:फिर्यादी होवून या पोलिस कर्मचार्या विरुध्द सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कराळे हे पोलिस निरीक्षक माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करंत आहेत.